सध्या पुण्यातील अपघात प्रकरणामुळे निष्काळजी वाहन चालक आणि अल्पवयीन वाहन चालक यांचा मुद्दा प्रकाशात आला आहे. राज्यभरामध्ये अशा वाहकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. मात्र तरी देखील काही तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाची गाडीवर जीवघेणा स्टंट करण्याची व्हिडिओ व्हायरल झाली आहे. व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कार चालक चक्क चालत्या गाडीमधून दार उघडून बाहेर येत आहे. आणि टपावर चढून बसत आहे. ती चालती कार तशीच पुढे जात आहे. धावत्या गाडीमधून असेच बाहेर येऊन स्टंट करणे कारचालकासोबत रस्त्यांवरील इतर चालकांच्या जीवावर देखील बेतणारे आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जीवघेण्या या स्टंटबाजीला लाखो नेटकऱ्यांनी लाईक केली आहे.
Iska part – 2 police upload karegi ? pic.twitter.com/gvnXw1PEOw
— Siya (@Siya17082000) May 28, 2024
मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. @siya1708200 या एक्स अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओतील बेजबाबदार कार चालकावर मुंबई पोलीस आणि झालावाड पोलीस यांनी दखल घेत कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.