Viral Video Drunk Man Climbed on mobile tower video goes viral
सोशळ मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओंचा भंडार आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतो. अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात की पाहून हसावे की रडावे हे कळत नाही. सध्या अशाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एका तरुणाने मद्यधुंद असवस्थेत असे काही केले आहे की, सगळीकडे गोंधळ उडाला आहे.
ही घटना भोपाळच्या बारखेडी भागात घडली असून यामध्ये एक तरुण मोबाईलच्या टॉवरवर उंच टोकावर चढला आहे. यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. याघटनेटची माहिती मिळताच बारखेडी पोलिसांना त्वरित पोहचून या तरुणाला वाचवले आहे. यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही. सध्या तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे. मात्र, त्याचे असे करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण भोपाळच्या एशबेग भारात राहत असून विवेक ठाकून असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 31 जानेवारी) दुपारच्या सुमारास हा तरुण मद्यधुंद असवस्थेत टॉवरवर चढला. त्याला चढताना पाहून अनेक लोकांनी त्याला खाली येण्यास सांगितले मात्र तो दारुच्या नशेत चढतच राहिला. लोकांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यामुळे पोलिस आणि बचावपथक लगेच घटनास्थळी पोहोचले त्याचे प्राण वाचवले. पोलिस आणि बचावपथकाने तरुणाशी संवाद साधून त्या तरुणाला काली आणले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने तो नक्कीच दारुच्या नशेत बायकोसाठी चांद-तारे तोडून आणण्यासाठी गेला असणार, तर दुसऱ्या एकाने पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. या अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे अनेकांनी आपला जीव गमवला असून या उदा. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, अशा घटना कितपत महागात पडू शकतात. तसेच अनेकांनी जीव संपवण्याचाही प्रयत्न अशा पद्धतीने केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.