मोबाईलचा नाद! रेल्वे ट्रॅकवर बसून गर्लफ्रेंडशी गप्प मारत होता पठ्ठ्या इतक्यात...; VIDEO पाहून उडेल थरकाप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडच्या काळात लोकांना मोबाईच असे व्यसन लागले आहे की, त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचेही भान नसते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अन्न, पाणी वस्त्र निवारा या तीन जीवनावश्यक गोष्टींमध्ये फोनचा समावेश झाला आहे. या नादात अनेकांसोबत मोठ्या दुर्घटना देखील घडल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, फोनवर बोलताना बऱ्याच लोकांना वेळेच भान राहत नाही, तर काहींना जागेचे भान राहत नाही, लोक कधी कधी बोलता बोलता कुठे जातील किती वेळ बोलतील सांगणे कठीण आहे. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला आहे.
नेमकं काय घडलं?
हा तरुण रेल्वे ट्रॅकवर फोनवर गर्लफ्रेंडशी गप्पा मारत बसला आहे. याच वेळी एका बाजूने ट्रेन येत आहे. मात्र या तरुणाला हे देखील लक्षात येत नाही. ट्रेनचा लोको पायलट अनेकवेळा हॉर्न देऊनही तरुण रेल्वे ट्रॅकवरुन उठत नाही. तरुण फोनवरच बोलण्यात मग्न असतो. पायटलच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला आहे. लोको पायलट काळी उतरुन या तरुणाला मारला देखील जातो मात्र, तरुण तिथीन पळ काढतो. या तरुणाला हेही लक्षात येत नाही ट्रेन भरधाव वेगामध्ये असती तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @army_lover_ajay_yadav_ghzipur या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. एका युजरने म्हटले आहे की, या जाम मार दिला पाहिलेज अशा लोकांना, तर दुसऱ्या एकाने अरे काय चाललंय काय, जीवाचा तरी परवा करा असे म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. लय बेकार नाद हाय असेही एका युदरने म्हटले आहे. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र हा प्रकार पाहून अनेकांनी संताप आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.