viral video young boy prank with girl delhi metro video goes viral
अलीकडे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक अजीबोगरीब स्टंट, जुगाड, डान्स, असे अनेक व्हिडिओ बनवत असतात.मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. कधी मेट्रोतील मारामारी, तर कधी डान्स, तर कधी भांडणांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणाने रीलसाठी असे काही केलं आहे की, याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
अलीकडे लोक सोशल मीडियासाठी लोकांसोबत प्रॅंक देखील करतात आणि याचे व्हिडिओ बनवून व्हायरल होतात. अनेकदा हे प्रॅंक हास्यास्पद असतात, तर अनेकदा याचे गंभीर परिणाम होतात. सध्या असाच एक दिल्ली मेट्रोतील प्रॅंकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणाने एका मुलीसोबत असा प्रॅंक केला आहे की ती पाहातच राहिली आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक मेट्रोत बसलेले दिसत आहेत. मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक तरुण आमि तरुणी उभे असून मेट्रो स्टेशनवर थांबलेली आहे. तसेच एक व्यक्ती हे दृश्य कॅमेरात कैद करत असून याच वेळी मेट्रोचे दार बंद होत असते. दरम्यान तरुणी दारवाज्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला बाहेर ढकलतो, यामुळे ती मेट्रोच्या बाहेर जाते आमि मेट्रोचे दार बंद होते. ती मागे वळून त्या तरुणाकडे पाहातच राहते. तर तरुण तिला बाय बाय करत असतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @delhi.connection या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिली आणि लाईक केले आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘मला समजत नाही की लोक व्हिडिओ बनवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर कसे जातात.’ तर दुसऱ्या एका युजरने, ‘वाईट वाटण्याची गरज नाही… हा फक्त लाईक्स आणि व्ह्यूजचा खेळ आहे, असे म्हटले आहे. आणखी एका युजरने ‘मेट्रोमध्ये अशा गोष्टी कोण करतो?’ असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ मात्र नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.