सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेक चिमुकल्यांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा ही लहान मुले कधी काय बोलतील, काय करतील याचा नेम नसतो. काही वेळा ही पोरं असा काहीतरी करतात यामुळे पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. यामुळे यांची काळजी घेणे पालंकाना अनेकदा कठीण जाते.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. यामध्ये दोन चिमुकले घराच्या अंगणात खेळत असतात. याचवेळी एक चिमुकला खेळता खेळता तिथेच असलेल्या वॉशिंग मशीनमध्ये चढतो आणि एका गोल भागात उतरतो. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. मसीमध्ये चढलेला चिमुकला मशीनवरील बटन चालू करतो आणि दुसरा चिमुकला प्लग चालून करतो यामुळे मशीन चालून झाल्यावर चिमुकला गरागरा फिरु लागतो. सुरुवातीला चिमुकल्याला मजा वाटत असते पण कही वेळात मशीन जोरात फिरु लागल्याने चिमुकला रडायला लागतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @yoo__bros या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ बनवणाऱ्याला अक्कल नसल्याचे म्हटले आहे. कारण व्हिडिओ बनवणारा फक्त बघतच राहिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोेशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे आणि त्या चिमुकल्याला काही झाले नाही ना याबाबत माहिती मिळालेली नाही. काही युजर्सने आई कुठे आहे, असे दुर्लक्ष कोण करते असे म्हटले आहे, तर काहींनी अरे देवा काय हा पराक्रम असे म्हटले आहे. पण अनेकदा चिमुकल्यांचा खोडकरपणा पालकांच्या आंगलट आला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.