बापरे! ॲनाकोंडासोबत आंघोळ करू लागली तरुणी, पाहून लोक हादरली; घटनेचा थरारक Video Viral
सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओज शेअर केले गेले आहेत. इथे बऱ्याचदा अशा काही घटना शेअर केल्या जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसावा. हेच कारण आहे की अशा धक्कादायक घटना इथे वेगाने व्हायरल होतात. सध्या देखील सोशल मीडियावर असाच काहीसा प्रकार व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये इतकी भयानक आहेत की पाहून तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओत नक्की काय दिसून आले ते जाणून घेऊयात.
नुकताच सोशल मीडियावर एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी चक्क एका ॲनाकोंडासोबत आंघोळ करताना दिसून आली आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचा असून व्हिडिओतील तरुणीचे नाव लॉरा लिओन असे आहे. आता मुळातच ॲनाकोंडा हा एक धोकादायक आणि जीवघेणा प्राणी आहे, तो प्राण्यांचेच काय तर माणसांचेही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही अशात तरुणीचे असे ॲनाकोंडासोबत आंघोळ करणे अनेकदा हैराण करत आहे. मुख्य म्हणजे यावेळी ती ॲनाकोंडाला किस करत त्यावर प्रेम करतानाही दिसली जे पाहणेच फार थरारक आहे. नक्की व्हिडिओत काय काय घडले ते जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक तरुणी बाथ टबमध्ये ॲनाकोंडासोयाबत बसल्याचे दिसून येते. तिच्या शरीराभोवती एक महाकाय ॲनाकोंडा गुंडाळलेला दिसतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये, ती तरुणी ॲनाकोंडाला मिठी मारताना, प्रेम करताना आणि त्याचे चुंबन घेतानाही दिसून येते जे पाहून अनेकांना आता आश्चर्याचा धक्का बसत आहे. तिच्या निर्भयतेचे आता अनेकजण कौतुक करत आहेत तर काहीजण तिच्या या कृतीवर जोरदार टीका देखील करत आहेत. व्हिडिओतील दृश्ये फार थरारक आणि भयावह असून अनेकांनी असे दृश्य याआधी कधीही पाहिले नाही ज्यामुळे हा व्हिडिओ अनेकांद्वारे वेगाने शेअर केला गेला आणि काही क्षणातच व्हायरल झाला.
तरुणीच्या या विचित्र प्रकाराचा व्हिडिओ @lauraisabelaleon नावाच्या तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “तुम्हाला खरोखर व्यावसायिक मदत घेणे आवश्यक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो तुला खाईल बाई”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.