26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली; दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या राजदूतांची ग्वाही

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेने 166 मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत ठामपणे उभे राहण्याची ग्वाही अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांनी दिली.
26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली;  दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही ( फोटो सौजन्य : आयएएनएस)
26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली; दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही ( फोटो सौजन्य : आयएएनएस)26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली; दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही ( फोटो सौजन्य : आयएएनएस)
Published on: 
Updated on: 
  • 26/11 हल्ल्यातील 166 मृतांची अमेरिकेकडून आठवण

  • सहा अमेरिकी नागरिकांचाही हल्ल्यात मृत्यू

  • सर्जियो गोर यांची एक्सवरून भावना व्यक्त

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेने हल्ल्यात प्राण गमावलेल्या 166 निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभी असून दोन्ही देश मिळून दहशतवादाचा मुकाबला करतील, अशी ग्वाही भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी दिली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या छायाचित्रासह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर संदेश प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या 166 नागरिकांचे अमेरिका आज स्मरण करत आहे. यामध्ये सहा अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता, असे गोर यांनी म्हटले आहे.

याच वर्षी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील स्मारकाला भेट दिली होती. यावेळी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यासोबतच भारतीय सुरक्षा दलांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले.

मार्को रुबियो यांनीही श्रद्धांजली वाहिलेली

दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका भारतासोबत आहे. दहशतवाद्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले.

तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही मुंबई हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली होती. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली;  दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही ( फोटो सौजन्य : आयएएनएस)
Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निष्पाप 166 जणांचा मृत्यू

26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी भ्याड हल्ले केले होते. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नरीमन हाऊस यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. तब्बल तीन दिवस चाललेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्याने भारतासह संपूर्ण जगाला सीमापार दहशतवादाच्या गंभीर धोक्याची जाणीव करून दिली.

26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली;  दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही ( फोटो सौजन्य : आयएएनएस)
US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी