Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अफगाणिस्तान भूकंपात ९५० ठार, पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के

सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट केले - दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांना तीव्र भूकंपाचा धक्का बसला. ज्यात आपले शेकडो देशवासी मारले गेले आणि जखमी झाले आणि घरे उद्ध्वस्त झाली.

  • By Sunil Chavan
Updated On: Jun 22, 2022 | 04:47 PM
अफगाणिस्तान भूकंपात ९५० ठार, पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे ( Afghanistan earthquake) मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ६.१ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे किमान ९५० (950 killed) लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून ४० किमी अंतरावर होता. दुसरीकडे, युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, या भूकंपाचा प्रभाव ५०० किमीच्या परिघात होता. त्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान (tremors were also felt in Pakistan) आणि भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट केले – दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांना तीव्र भूकंपाचा धक्का बसला. ज्यात आपले शेकडो देशवासी मारले गेले आणि जखमी झाले आणि घरे उद्ध्वस्त झाली. आम्ही सर्व आपत्कालीन एजन्सींना आवाहन करतो की पुढील विनाश टाळण्यासाठी या भागात टीम पाठवा.

अफगाणिस्तानच्या राज्य वृत्तसंस्थेचे रिपोर्टर अब्दुल वाहिद रायन यांनी ट्विट केले की पक्तिका प्रांतातील बर्मल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यात मृतांची संख्या २५५ वर पोहोचली आहे, तर १५५ लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलांची हेलिकॉप्टर परिसरात पोहोचली आहे.

इस्लामाबाद आणि रावळपिंडीत भूकंपाचे धक्के जाणवले
दुसरीकडे, पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानात शुक्रवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Web Title: 950 killed in afghanistan earthquake the tremors were also felt in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • Afghanistan Earthquake

संबंधित बातम्या

स्री असणं ठरलं गुन्हा! भूकंपात तालिबान फतव्यामुळे महिलांची ३६ तास दुर्दशा ; पुरुष बचाव कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास दिला नकार
1

स्री असणं ठरलं गुन्हा! भूकंपात तालिबान फतव्यामुळे महिलांची ३६ तास दुर्दशा ; पुरुष बचाव कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास दिला नकार

Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट
2

Afghanistan Earthquake : पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; कमी तीव्रतेच्या धक्क्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा कहर! मृतांचा आकाडा १००० पार; तालिबान सरकारकडून मदतीची हाक
3

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा कहर! मृतांचा आकाडा १००० पार; तालिबान सरकारकडून मदतीची हाक

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपानंतर परिस्थिती बिकट; आपात्कालीन आणि वैद्यकीय सेवांचा अभाव
4

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपानंतर परिस्थिती बिकट; आपात्कालीन आणि वैद्यकीय सेवांचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.