Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फक्त ‘या’ दोन गोष्टी केल्या तर…’ इराण अणुशक्ती बनण्यापासून दोन पावलं दूर, पेंटागॉनचा खळबळजनक अहवाल समोर

Pentagon Iran nuclear capability : या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, इराणच्या अणुस्थळांचे फारसे नुकसान झालेले नाही आणि केवळ २ लहान तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्या तर इराण लगेच अण्वस्त्र तयार करू शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 25, 2025 | 05:27 PM
Are America's claims false Pentagon says Iran still capable of nuclear weapons

Are America's claims false Pentagon says Iran still capable of nuclear weapons

Follow Us
Close
Follow Us:

Pentagon Iran nuclear capability : अमेरिकेच्या बंकर बस्टर हल्ल्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर करत असतानाच, पेंटागॉनच्या गुप्तचर अहवालाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवली आहे. या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, इराणच्या अणुस्थळांचे फारसे नुकसान झालेले नाही आणि केवळ २ लहान तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्या तर इराण लगेच अण्वस्त्र तयार करू शकतो. अहवालानुसार, इराणला फक्त अणुसाइट्सची साफसफाई आणि आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागेल, आणि त्यानंतर तो पुन्हा त्याचा अण्विक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने सुरु करू शकेल.

बहुतेक सेंट्रीफ्यूज अजूनही सुरक्षित – अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचा दावा

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पेंटागॉनच्या एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणचे बहुतांश सेंट्रीफ्यूज सुरक्षित आहेत. त्यामुळे इराणला पुन्हा अण्वस्त्र निर्माणाच्या दिशेने वाटचाल करणे फार कठीण राहणार नाही. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इराण किती लवकर अण्वस्त्र बनवेल हे त्या सुविधांची साफसफाई आणि पुनर्बांधणी किती लवकर होते यावर अवलंबून आहे. यासंदर्भात अल-अरेबिया वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराण दोन महिन्यांत पुन्हा आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran–Israel war : ‘स्मशान शांतता अन् ताजे व्रण…’ इस्रायलमध्ये ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त, पाहा Recent Update

इराणकडून पुन्हा स्पष्टवक्तेपणा – ‘अणुप्रकल्प चालूच राहील’

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे सांगितले की, आमचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबलेला नाही आणि त्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. त्यांनी असेही सांगितले की, “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून युरेनियम समृद्ध करत आहोत. इराण एक शांतताप्रिय देश आहे आणि आम्ही कोणाच्याही दबावासमोर झुकणार नाही.” अराघची यांच्या या विधानानंतर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंता अधिक वाढली आहे. विशेषतः इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून इराणच्या अणुक्षमता वाढण्याकडे कायम लक्ष ठेवले जात आहे.

इराणकडे सध्या ४०० किलो समृद्ध युरेनियम – IAEA चा अहवाल

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) च्या अहवालानुसार, इराणकडे सध्या ४०० किलोपेक्षा अधिक समृद्ध युरेनियम साठवलेले आहे. हे युरेनियम सेंट्रीफ्यूज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समृद्ध करण्यात आले आहे, आणि ते अण्वस्त्र निर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणने काही प्रमाणातील युरेनियम सुरक्षित स्थळी हलवले होते, त्यामुळे संभाव्य हानीपासून तो यशस्वीरीत्या वाचला आहे.

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा तापणार?

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी वक्तव्य करत दावा केला की, इराणला आता अण्वस्त्र बनविणे अशक्य आहे, पण पेंटागॉनच्या गुप्तचर अहवालामुळे त्यांच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही परिस्थिती वॉशिंग्टनपासून तेहरान आणि तेल-अवीवपर्यंत तणाव वाढवणारी आहे. इराण जर प्रत्यक्षात पुन्हा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करतो, तर त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्रावर आणि जागतिक स्थैर्यावर होतील, असा इशारा तज्ञ देत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिंद महासागरात रचला जातोय मृत्यूचा सापळा? भारतासाठी सावधानतेचा इशारा, ‘या’ तीन देशांचे मिळून मोठे षडयंत्र

अणुबॉम्बपासून अवघ्या दोन पावले दूर?

पेंटागॉनच्या या अहवालामुळे इराणच्या अण्वस्त्र क्षमतेबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे. जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे की, इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या दारात उभा आहे आणि फक्त दोन तांत्रिक गोष्टी केल्या की, तो आण्विक शक्ती म्हणून पुन्हा उभा राहील. यामुळे आगामी काळात अमेरिकेचा दबाव वाढू शकतो आणि पश्चिम आशियात आणखी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Are americas claims false pentagon says iran still capable of nuclear weapons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 05:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.