मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार! इस्रायल नाही तर हा देश करणार युद्धविरामाचं उल्लंघन?
30,000 homes lost Israel : इराण आणि इस्रायलमधील भीषण युद्ध संपल्याची घोषणा झाली असली, तरी त्याचे घाव अद्यापही इस्रायली भूमीवर ठसठशीतपणे जाणवत आहेत. अवघ्या १२ दिवसांच्या संघर्षात इस्रायलने जो विनाश पाहिला, त्याचे खरे चित्र आता हळूहळू समोर येत आहे. इस्रायली कर प्राधिकरणाच्या भरपाई विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ३८,७०० नुकसानभरपाईचे अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये ३० हजारांहून अधिक तक्रारी घरे उद्ध्वस्त झाल्याच्या आहेत.
१३ जून रोजी सुरू झालेल्या युद्धाच्या दरम्यान इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर भौतिक हानी केली. ३०,८०९ अर्ज हे घरे, अपार्टमेंट किंवा निवासी इमारतींच्या नुकसानीसंदर्भात दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, ३,७१३ अर्ज वाहनांच्या नुकसानीसाठी आणि ४,०८५ अर्ज यंत्रसामग्री, फर्निचर आणि इतर वस्तूंच्या नुकसानासाठी दाखल झाले आहेत. या आकडेवारीवरून युद्धाचा परिणाम सामान्य जनतेच्या आयुष्यावर किती मोठा आणि गंभीर होता, हे स्पष्ट होते. तज्ज्ञांच्या मते, अद्याप हजारो इमारतींच्या नुकसानीबाबत दावे दाखल व्हायचे आहेत, त्यामुळे येत्या काळात अर्जांची संख्या आणखी वाढू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 400 kg enriched uranium missing : ‘इराणचे 400 किलो युरेनियम…’ अखेर उपराष्ट्रपती व्हान्स यांनी कबूल केलं सत्य
स्थानिक वेबसाईट ‘बहादेरी हरेदीम’ च्या अहवालानुसार, राजधानी तेल अवीवमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे एकट्या शहरातूनच २४,९३२ दावे दाखल झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अश्कलोन हे दक्षिणेकडील शहर आहे, जिथून १०,७९३ दावे प्राप्त झाले आहेत. ही दोन्ही शहरे इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य ठरली होती.
इस्रायली सरकारने अद्याप नुकसानीच्या भरपाईसाठी कोणताही अधिकृत आर्थिक आकडा घोषित केलेला नाही. मात्र, सध्याच्या अर्जांच्या संख्येवरून आणि त्यामागील विध्वंस पाहता, ही रक्कम अब्जो डॉलरमध्ये जाऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. युद्ध थांबले असले, तरी त्याचा आर्थिक भार इस्रायल सरकार आणि सामान्य नागरिकांवर दीर्घकाळ जाणवणार आहे.
या युद्धाची सुरुवात इस्रायलने इराणच्या अणु तळांवर केलेल्या हल्ल्यापासून झाली होती. इस्रायलने असा दावा केला होता की इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या अंतिम टप्प्यावर आहे. इराणने ही गोष्ट फेटाळली आणि प्रतिउत्तर म्हणून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. अमेरिकेने यामध्ये उडी घेत इराणच्या तीन अणु तळांवर जोरदार बॉम्बहल्ला केला. १२ दिवसांच्या या तणावानंतर अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran On IAEA : इराण IAEA सोबतचे सर्व संबंध तोडणार! संसदेने मंजूर केले विधेयक, म्हटले- ‘सुरक्षेची हमी…’
युद्ध आता थांबले असले, तरी त्याने मागे सोडलेल्या जखमा इस्रायलसाठी दीर्घकालीन संकट ठरू शकतात. शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत, शहरांचे स्वरूप बदलले आहे आणि लोकांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडले आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलला केवळ भौतिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक पातळीवरही हादरवले आहे. युद्धाच्या या राखेतून इस्रायल कधी आणि कसा सावरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.