शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू; आज पृथ्वीवर पोहोचणार
वॉशिंग्टन : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मिशन ‘अॅक्सिओम-4’यशस्वी झाले आहे. आता शुभांशू शुक्ला आपल्या पूर्ण टीमसह पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यानुसार, आज (मंगळवारी) दुपारी तीनच्या सुमारास ते पृथ्वीवर उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शुभांशू शुक्ला यांचे यान 14 जुलैला सायंकाळी 4.45 वाजता आयएसएसच्या हार्मनी मॉड्यूलमधून अंतराळयान अनडॉक करण्यात आले.
या मोहिमेतील चारही अंतराळवीर अॅक्सिओम-4 मिशनअंतर्गत 26 जून रोजी आयएसएसवर पोहोचले होते. परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी, मिशन पायलट शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे मिशन तज्ज्ञ स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांनी ड्रॅगन ग्रेस अंतराळयानात प्रवेश केला आणि पृथ्वीवर 23 तासांच्या प्रवासासाठी त्यांचे अंतराळ सूट घातले. त्यांनी सोमवारी (दि.१४) सायंकाळी ४.४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन परण्यासाठी उड्डाण केले.
दरम्यान, अंतराळयान आयएसएसपासून वेगळे झाल्यानंतर, ड्रॅगन आयएसएसपासून सुरक्षित अंतर निर्माण करण्यासाठी आणि पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी इंजिन ऑपरेशन्सची मालिका करेल. अंतिम तयारीमध्ये कॅप्सूल वेगळे करणे आणि पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी हिट शिल्ड स्थापित करणे, यांचा समावेश असणार आहे, जे अंतराळयानाला सुमारे १६०० अंश सेल्सिअस तापमानात उघड करणार आहे.
पृथ्वीवर येण्यासाठी झाले रवाना
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा पृथ्वीसाठी प्रवास सुरू झाला आहे. शुभांशू यांच्यासह चार अंतराळवीर सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीसाठी रवाना झाले. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर त्यांचे ड्रॅगन अंतराळयान आज, मंगळवारी दुपारी ३ वाजता उतरेल सलशडाउन करेल. त्यात नासाचे हार्डवेअर आणि ६० हून अधिक प्रयोगांमधील डेटा समाविष्ट असेल.
ड्रॅगन ग्रेस अंतराळयानाचे हॅच बंद
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडणाऱ्या ड्रॅगन ग्रेस अंतराळयानाचे हॅच बंद करण्यात आले आणि क्रू सदस्यांनी कक्षीय प्रयोगशाळेपासून वेगळे होण्यापूर्वी अंतिम तपासणी केली.