Strait of Hormuz : जगावर महागाईचे सावट! ट्रम्प यांच्या होर्मुझ नाकेबंदीला ऑस्ट्रेलियाचा ठाम नकार, संघर्षात एकटी पडली अमेरिका? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानमध्ये अमेरिका इराणमध्ये इस्लामाबाद येथे वाटाघाटी चर्चा सुरु होती. परंतु ही चर्चा निष्फळ ठरल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला असून आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, अमेरिकन नौदल होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांची ये-जा तात्काळ रोखणार आहे. या मोहिमेत ऑस्ट्रेलिया, जपान सारखे देश अमेरिकेला साथ देणार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता.
मात्र ऑस्ट्रेलियाने ट्रम्प यांना साथ देण्यास नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्पष्ट केले आहे की, आम्हाला अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारची विनंतीचा प्रस्ताव मिळालेला नाही. हा एकतर्फ निर्णय आहे. ऑस्ट्रेलिया म्हटले की, हा संघर्ष लवकरात लवकर संपवा अशा आशा व्यक्त करतो. सर्व देशांच्या वाहतुकीसाठी होर्मुझ खुला झाला पाहिजे. यामुळे दोन्ही देशांनी पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर एकत्र येऊन शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा असे अल्बानीज यांनी म्हटले. तसेच त्यांनी स्पष्ट केले इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाईत ऑस्ट्रेलियाचा सहभाग नसेल.
याशिवाय, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांनी देखील अमेरिकेला साथ देण्यास नकार दिला आहे. कॅनडाने, ग्रीस, फिनलँड, नॉर्वे, नेदरलँड्स या देशांनी देखील या लष्करी कारवाईपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणने चर्चा असफल होण्यासाठी अमेरिकेलाच जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या जाचक अटी आणि तटस्थ भूमिकेमुळेच कोणताही करार होऊ शकला नाही असे म्हटले आहे. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) बंद करण्याच्या या पावलाला लूटमार म्हणून संबोधले आहे. तसेच याला चोख प्रत्युत्तर देण्याची धमकीही दिली आहे. सध्या इतर युरोपीय देशांच्या तटस्थ भूमिकेमुळे आतंरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका एकटी पडल्याचे संकेत मिळत आहेत.
Trump यांनी स्वतःला ‘येशू ख्रिस्ताचा अवतार’ केलं घोषित; पोप लिओबद्दलही वादग्रस्त व्यक्त, जगात खळबळ
Ans: पाकिस्तानमध्ये अमेरिका इराणमध्ये पार पडलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकरा दिला आहे. यामुळे ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत होर्मुझच्या नाकेबंदीची घोषणा केली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियाला संघर्ष लवकरात लवकर संपून होर्मुझ सर्व देशांसाठी खुला व्हावा अशी इच्छा आहे. यामुळे अमेरिका इराणने पुन्हा शांतता चर्चेच्या टेबलावर यावे असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
Ans: होर्मुझची सामुद्रधुनी हा जगाच्या तेल व्यापाराच्या मार्गापैकी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन २०-३० टक्के कच्चा तेलाची वाहतूक जागतिक बाजारपेठेत होते. हा पुरवठा थांबल्यास जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते.






