काठमांडू : हिमालयाच्या (Himalaya) पर्वत रागांमधील माऊंट मनास्लूवर (Mount Manaslu) हिमस्खल झाले आहे. यामध्ये दोन गिर्यारोहकांचा (Mountaineer) मृत्यू झाला असून इतर दहा जण अडकले आहेत. तसेच, त्यांच्या शोधासाठी बचाव मोहिम (Rescue Mission) राबवण्यात येत आहे, अशी माहिती यासंबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
माऊंट मनास्लूवरील मोहिमेसाठी १२ गिर्यारोहकांचा गट गेला होता. या मोहिमेदरम्यान, हिमस्खलन (Avalanache) झाल्याने हे सर्वजण अडकून जखमी झाले. यांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले होते. पण नंतर यातील दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये शेर्मा क्लाईंबर्स, सातोरी अॅडव्हेंचर, इमॅजिन नेपाल ट्रेक्स, इलाइट एक्स्पेडेशन आणि ८ के एक्स्पेडेशन या संघटनांच्या गिर्यारोहकांचा यामध्ये समावेश आहे.
Nepal | At least 2 climbers dead, many injured in an avalanche at Mt. Manaslu; rescue and search operation underway: officials
— ANI (@ANI) September 26, 2022
मोहिमेच्या चौथ्या कँपपूर्वीच दुर्घटना घडली आहे. या महिन्यातील २८ ते २९ सप्टेंबरपर्यंत ४०० गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. पण तत्पूर्वीच अशी घटना घडल्याने भीती व्यक्त होत आहे. या मोहिमेतील इमॅजिन नेपाल ट्रेकर्सचा प्रतिनिधी दावा शेर्पा यांनी सांगितले की, यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.