Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका येथील प्रसिद्ध जगन्नाथ विद्यापीठाच्या आवारात नवरात्रीच्या पवित्र काळात एक अत्यंत धक्कादायक आणि विवादित घटना समोर आली आहे. विद्यापीठातील काही मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी आवारात असलेल्या एका मंदिराच्या अगदी जवळ दोन गायींची कत्तल करून ते गोमांस शिजवून खाल्ल्याचा गंभीर आरोप हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे ढाका शहरात आणि संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले असून हिंदू धर्मीयांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, या वादाची सुरुवात १२ ऑक्टोबर रोजी झाली. नवरात्रीचा सण सुरू असतानाच काही मुस्लिम संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील मंदिरासमोर गोमांस घालून बिर्याणी तयार केली होती. या कृत्याला हिंदू विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. वाढता तणाव पाहता विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नोटीस जारी करून आवारात असे चिथावणीखोर कृत्य करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
विद्यापीठ प्रशासनाच्या नोटीसला केराची टोपली दाखवत मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. ‘मजलिस’ नावाच्या एका विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या आवारातच गोहत्या करण्याची खुली योजना जाहीर करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष माध्यमातून क्राउडफंडिंग मोहीम राबवून प्रत्येकी ५० रुपयांची देणगी गोळा केली. यातून एक गाय खरेदी करण्यात आली, तर दुसऱ्या एका मुस्लिम संघटनेने विद्यार्थ्यांना दुसरी गाय भेट म्हणून दिली.
Tonight at Dhaka, Muslim students of Jagannath University are cooking beef in front of its central Temple. Hindu students protested, but administration sided with muslims. https://t.co/NS597efcJd — Joy Das 🇧🇩 (@joydas1844417) October 12, 2026
credit – social media and Twitter
प्रशासनाचा स्पष्ट मनाई हुकूम असतानाही या दोन्ही गायींची विद्यापीठाच्या आवारातच कत्तल करण्यात आली आणि मंदिर परिसराजवळच मांस शिजवून खाण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर विद्यापीठ प्रशासन आणि बांगलादेशचे अंतरिम सरकार बचावात्मक भूमिकेत दिसतात. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी “यात कोणताही मोठा वाद निर्माण झालेला नाही” असा दावा करत कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली आहे, ज्यामुळे हिंदू संघटनांमध्ये प्रशासनाविरोधात संताप अधिकच वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर
बांगलादेशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८ टक्क्यांहून अधिक भाग असलेला हिंदू समुदाय सध्या अत्यंत दहशतीखाली जगत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळात अल्पसंख्याक हिंदू समुदायाला मिळणारे संरक्षण आता राहिलेले नाही, असा आरोप सातत्याने केला जात आहे. शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर आणि राजकीय उलथापालथीनंतर बांगलादेशातील मंदिरांवर आणि हिंदू धर्मीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आवामी लीग पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या दुर्गापूजा उत्सवा दरम्यान देशभरात किमान ३४ हून अधिक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड, मंडपांचे नुकसान आणि भाविकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि धार्मिक अत्याचार चिंताजनक रीतीने वाढल्याचे स्पष्ट केले आहे.






