Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! अफगणिस्तानच्या राजधानीत स्फोट; तालिबानच्या मंत्र्यानेच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

राजधानी काबूलमध्ये मंत्रालय परिसरात हा स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला त्याबद्दल अजून खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 11, 2024 | 09:37 PM
मोठी बातमी! अफगणिस्तानच्या राजधानीत स्फोट; तालिबानच्या मंत्र्यानेच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! अफगणिस्तानच्या राजधानीत स्फोट; तालिबानच्या मंत्र्यानेच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: अफगणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे राज्य आहे. तेथील नागरिकांवर तालिबानी सरकारची सत्ता आहे. दरम्यान अफगणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक स्फोट झाला आहे. हा स्फोट अफघणिस्तानच्या निर्वासित मंत्रालयाच्या परिसरात हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता मोठी असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तालिबानच्या एक मंत्र्यांसाह अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अफघणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एक मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट निर्वासित मंत्रालयाच्या परिसरात झाला आहे. या स्फोटामध्ये तालिबान सरकारचे मंत्री खलील रहमान हक्कानी यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा अंगरक्षक आणि 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तालिबान सरकारमधील मंत्री खलील रहमान हक्कानी हे खोस्तमधून येणाऱ्या लोकांना होस्ट करत असताना हा स्फोट झाला. तालिबान सरकारने याबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे.

राजधानी काबूलमध्ये मंत्रालय परिसरात हा स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला त्याबद्दल अजून खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. या स्फोटात हल्लेखोर देखील मारला गेल्याचे वृत्त समोर येत आहे. स्फोटांमुळे जवळच्या परिसरातील अनेक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या स्फोटात कोणत्या संघटनेचा हात आहे, याचा तपास तालिबान सरकारने सुरू केला आहे.

तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अफगाण महिलांचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यातील मुख्य अधिकार म्हणजे शिक्षण. तालिबानने अफगाण महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानने आणखी एक तानाशाही निर्णय घेतला आहे. त्यांनी अफगाण महिलांना मिडवाइफरी ( दाई) म्हणून काम करण्यास आणि नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे.

 

अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद

मीडिया रिपोर्टनुसार, महिलांसाठी शिक्षण घेण्याचे हे दोन्ही मार्ग देखील आता तालिबानने बंद केल्याने अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सध्या आरोग्य व्यवस्था गंभीर परिस्थितीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 मध्ये जाहीर केले होते की, देशाला गरजा भागवण्यासाठी किमान 18,000 दाईंची आवश्यकता आहे. परंतु, दाई बनण्यासाठी किंवा नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिलांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

हेही वाचा: तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

तालिबानने पुढील आदेशापर्यंत हे शिक्षण बंद ठेवण्यास सांगितले आहे. पण, तालिबान सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने वचन दिले होते की, अभ्यासक्रम इस्लामिक तत्वांशी सुसंगत बनवून नंतर शिक्षण पुन्हा सुरू केरण्यात येईल. मात्र, 2021 पासून किशोरवयीन मुलींना शिक्षणापासून अद्यापही वंचित ठेवण्यात आले आहे.

आता दाई किंवा नर्सिंग शिक्षण घेणे हे महिलांसाठी शिक्षणाचे एकमेव पर्याय होते. मात्र, हे पर्यायही बंद करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान महिलांवर उपचार करण्यासाठी पुरुष डॉक्टरांना पुरुष संरक्षकाच्या उपस्थितीतच परवानगी आहे. सध्या 17,000 महिला नर्सिंग किंवा दाईचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, तालिबानच्या या निर्णयामुळे या महिलांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.

 

 

Web Title: Blast at afghanistan capital kabul taliban minister and 12 persons loss their life international marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 08:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.