Cambodia calls for an immediate and unconditional ceasefire
Thailand Cambodia War : रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्धानंतर आला आग्रेय आशियात कंबोडिया आणि थायलंड संघर्षाच्या आगीत जळत आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये गेल्या तीन दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकांना जीव वाचवण्यासाठी आपले घर सोडून जावे लागले आहे.
सध्या परस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. याच दरम्यान कंबोडियाने वाढता संघर्ष पाहता संयुक्त राष्ट्रातर्फे कोणत्याही अटीशिवाय तात्काळ युद्धबंद्धी करण्याचे आवाहन केले आहे.
कंबोडियाचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत चिया केओ यांनी युद्धबंदीचे आवाहन केले आहे. त्यांनी सीमेवर सुरु असलेला हिंसाचार तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी दोन्ही देशांना शांतता चर्चेने तणावाचे समाधान करण्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप थायलंडकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. सध्या थायलंडने सीमावर्ती प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू केला आहे. देशाचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी परिस्थिती अधिक बिकट होत असून तीव्र युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे.
Pakistan Flood: पावसाने पाकिस्तानला धू-धू धुतले; २६६ नागरिकांचा मृत्यू तर ६०० पेक्षा जास्त…
गुरुवारी (२४ जुलै) सुरु झालेल्या या संघर्षाने तीव्र रुप घेतले आहे. गेल्या तीन दिवसात गोळीबार, हवाई हल्ले, तोफखानांचा वाराच्या घटना घडल्या आहेत. थायलंडने अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानांसोबत स्वदेशी विकसित ड्रोन देखील तयार केले आहे. या ड्रोनमध्ये M472 मोर्टार बॉम्ब बसवण्यात आले आहे. कंबोडिया डेपो, तोफखाना आणि रॉकेट्स लॉंचिंग स्टिस्टमला या ड्रोन्सने लक्ष्य केले जात आहे. यामुळे कंबोडियाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कंबोडियाला मोठा धक्का बसला आहे.
थायलंड आणि कंबोडियातील हा ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
Thailand-Cambodia conflict: सीमावादातून थायलंड-कंबोडियामध्ये संघर्ष तीव्र; चीनला नेमकं हवंय काय?