घरात लहानग्या पाहुण्यांच्या आगमनाने सगळेच खूश होतात. प्रत्येक देशात गरोदर महिला, नवजात बालके, (new born baby) मुलं यांच्यासाठीही सरकारच्या काही योजना आहेत. काही कंपन्या गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना काही सुविधाही देतात. मात्र, आता एक कंपनी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मुलांना जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने ५-५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. एका खासगी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ही मोठी ऑफर दिली आहे. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घ्या.
[read_also content=”आता ट्विटरवर सर्वांनाच दिसणार नाहीत ट्विट, आधी ‘हे’ काम करावे लागेल, मस्कने आणला नवा नियम https://www.navarashtra.com/india/non-twitter-users-can-no-longer-see-tweets-and-profile-on-twitter-elon-musk-make-new-update-in-twitter-nrps-425883.html”]
लोकसंख्येमध्ये कायमच समोर राहिलेल्या या चीनमधून (China) ही बातमी समोर आली आहे. येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मुलांना जन्म दिल्यास 5 लाख रुपये देण्याची ऑफर दिली दिली आहे. १ जुलैपासून हा नियम लागू होणार आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेम्स लियांग म्हणाले, “आम्ही जगभरातील आमच्या कर्मचार्यांना त्यांच्या प्रत्येक मुलासाठी 5 वर्षांसाठी प्रति वर्ष 10,000 युआन देऊ. हे पेमेंट पालकांच्या अनुदानाअंतर्गत केले जाईल. अब्ज युआन खर्च केले जातील. .”
चीन आणि जपानसह अनेक देशांची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्यामुळे येथीस सरकार लोकांवर अधिक मुले व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना विविध ऑफर्स दिल्या जात आहेत.