बेडरूम-सोफा ते आलिशान बाथरूमपर्यंत..., डोनाल्ड ट्रम्प यांना कतारकडून ३३ अब्ज किमतीचे विमान भेट? (फोटो सौजन्य: एक्स/ @faridbbf)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. सध्या ट्रम्प त्यांना मिळमाऱ्या अब्ज डॉलर्स किमितीच्या विमानानुळे चर्चेचा विषय बनत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर जाणार असून दुसऱ्या काळाताली त्यांचा हा पहिलाच अरेबियात देशातील दौरा आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीतील विजयानंतर सौदी अरेबियामध्ये अमेरिका 600 अब्ज डॉलर गुंतवणूक करेल असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी सैदीच्या क्राउन प्रिन्स शोबत अनेक वेला चर्चा केली. त्यांच्या मैत्रीची चर्चा सध्या होत आहे.
याच वेळी ट्रम्प यांच्या सौदी भेटीदरम्यान कतारचे राजघराणेही उपस्थित राहण आहे. या भेटीदरम्यान कतारच्या राजघराण्याने ट्रम्प यांनी भेट म्हणून एक अलिशान बोईंग ७४७-८ जंबो जेट विमान देणार असल्याचे म्हटले जात आहे. या विमानाची किमंत जवळपास 400 अब्ज डॉलर आहे. भविष्यामध्ये हे विमान राष्ट्रपतींच्या विमानात रुपांतरित केले जाऊ शकते. हे विमान इतके अलिशान आहे की, यामध्ये एक बेडरुम, बाथरुम, देखील आहे. हे विमान पाहू तुमचे डोळे आश्चर्याने उघडेच राहतील.
🇺🇸 USA 🇶🇦 QATAR
Trump s’apprête à accepter un luxueux Boeing 747-8 jumbo jet d’une valeur de 400 millions $ de la famille royale qatarie
Il servira d’Air Force One pour Trump jusqu’à ce qu’il quitte ses fonctions,il sera transférée à sa fondation de bibliothèque présidentielle pic.twitter.com/mHLh22eU1i— Farid Benamer-B (@faridbbf) May 11, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प कतार भेट देतील त्यावेळी कतारच्या राजघराण्याकडून हे विमान ट्रम्प यांनी भेट मिळण्याची शक्यता आहे. १३ मे रोजी ट्रम्प मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर रवाना होमार आहेत. या दौऱ्यादरम्यान सौदी अरेबिया, यूएई आणि कतार ते भेट देतील. इस्रायलचा दौरा यामध्ये समाविष्ट नाही. परंतु या दौऱ्यादरम्यान इस्रायल आणि हमास युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्टरम्प यांनी कतारच्या राजघराण्याकडून मिळणार असलेले आलिषान बोईंग ७४७-८ जंबा जोट विमान अतिशय अलिसान आहे. या विमानात एक मास्टर बेडरुम, ६-७ लोकांसाठी कॉन्फरन्स रुम, अनेक लाऊंज आणि बाथरुमचा समावेश आहे. हे विमान दोन मजली आहे.
यापूर्वी ट्रम्प यंनी पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानताळावर आलिशान जेटने प्रवास केला होता. वॉल स्ट्रीटने दिलेल्या माहितीनुसारत, ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रपंतींच्या वापरासाठी बोईंग ७४७ अपग्रेड करणार असल्याचे म्हटले आहे. हे विमान कतारच्या राजघराण्यानेनही वापरले आहे.
दरम्यान या बातम्या पसरल्यानंतर कतारच्या मीडीया अताशे अली अल-अन्सारी यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यत्रक्ष ट्रम्प यांच्या अगामी भेटीदरम्यान कतारला भेट देणार असल्याची माहिती खोटी आहे. तसेच विमानाच्या हस्तांतरणाबाबतीत सध्या चर्चा सुरु आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.