'आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत...', पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष ७ मे ते 10 मे पर्यंत चालेल्या संघर्षाला अखेर विराम मिळाला आहे. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओनी चर्चा करुन युद्धबंदीवर सहमती दर्शवली. दरम्यान या चार दिवसांच्या संघर्षाबाबत पाकिस्तानकडून अनेक दावे केले जात आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, या लढाईत पाकिस्तानने भारताचा पूर्ण पराभव केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्य अधिकार्यंनी हास्यास्पद विधान केले आहे.
पाकिस्तान लष्कराने भारताची राजधानी दिल्लीत ड्रोन पाठवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
❗️ Pakistan claims its drones ‘hovered over’ Indian CAPITAL New Delhi pic.twitter.com/FQyDM7D3XV
— RT (@RT_com) May 11, 2025
पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी डीजी आयएसपीआर अहमद शरीफ चौधरी यांच्या एका पत्रकार परिषदेची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमच्या ड्रोन हल्ल्याने भारत हादरला आहे. पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या अनेक शहरांपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये भारताची राजधानी दिल्लीवरही आमचे एक ड्रोन घिरट्या घालत होते.
पाकिस्तानी लष्कराने सूरत गड, सिरसा, भटिंडा, बर्नाला, भुज, नलिया अधमपूर, हलवारा, जम्मू, अवंतीपुरा, श्रीनगर, उधमपूर, मामून, अंबाला आणि पठाकोट येथे भारतीय लष्करी तळांवर हल्ले केले होते. तसेच बियास आणि नगरोटा येथील ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या केंद्राला लक्ष्य केले होते. तथापि भारताने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले हाणून पाडले होते. तसेच बारत सरकारने पाकिस्तानचे ड्रोन दिल्लीमध्ये आढळल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर भारतीय सोशल नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या दिल्लीपर्यंत ड्रोन पोहोचल्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी ड्रोन दिल्लीत छोले बटुरे खाण्यासाठी आले होते. खरं तर पाकिस्तानचे कोणतेही ड्रोन दिल्लीपर्यंत पोहोचलेल नाही. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले होते. परंतु पंजाब आणि काश्मीरतच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडण्यात आले होते.
भारतासोबत सुरु झालेल्या संघर्षापासून पाकिस्तानी सैन्याने अनेक खोटे दावे केले आहेत. परंतु भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे सर्व दाव्याचे खंडन केले आहे. यामध्ये भारतीय महिला पायलट देखील पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा कोणताही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही. पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी भारतात सतत प्रयत्न करत आहे.