
Elon Musk named his son Shekhar in honor of the scientist and called his partner Half-Indian
Elon Musk Son named Sekhar : टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे सीईओ तसेच जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले एलोन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी कारण केवळ त्यांचा एखादा तंत्रज्ञान प्रकल्प नाही, तर भारताशी जोडलेला एक भावनिक आणि सन्मानाचा निर्णय आहे. मस्क यांनी अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान खुलासा केला की, त्यांच्या एका मुलाचे मधले नाव ‘शेखर’ असे आहे आणि हे नाव त्यांनी महान भारतीय-अमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे. हा खुलासा समोर आल्यानंतर जगभरात, विशेषतः भारतात, मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एलोन मस्क यांनी सांगितले की, “तुम्हाला कदाचित माहिती नसेल, परंतु माझा जोडीदार शिवोन गिलिस ही अर्धी भारतीय आहे आणि आमच्या एका मुलाचे मधले नाव ‘शेखर’ आहे. हे नाव मी चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ ठेवले.” मस्क यांची ही टिप्पणी केवळ एका नावापुरती मर्यादित नसून ती भारतीय बुद्धिमत्ता, विज्ञान परंपरा आणि संशोधनातील योगदानाला दिलेली मोठी मान्यता मानली जात आहे. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे विसाव्या शतकातील सर्वात महान खगोलभौतिकशास्त्रज्ञांपैकी एक असून त्यांनी तार्यांच्या उत्क्रांतीसंदर्भातील अति-महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना 1983 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shadow Fleet : ‘हा VIRATआहे, आम्हाला मदत हवी आहे, मेडे…मेडे’; रशिया युक्रेनचा ब्लॅक सीमध्ये युद्ध थरार, तुर्की मात्र अनभिज्ञ
मस्क यांची जोडीदार शिवोन गिलिस या कॅनडामध्ये वाढल्या असून सध्या त्या न्यूरालिंक या कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत कुशल व्यावसायिक असून 2017 पासून त्या न्यूरालिंकमध्ये महत्वाच्या भूमिका बजावत आहेत. सध्या त्या कंपनीच्या ऑपरेशन्स आणि विशेष प्रकल्पांच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिवोन यांचे भारतीय मूळ त्यांच्या पूर्वजांशी संबंधित असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले. त्या स्वतः भारतात वास्तव्यास होत्या की नाही, हे पूर्णपणे मस्क यांनाही माहीत नाही, पण त्यांचा सांस्कृतिक आणि वंशपरंपरेचा भारताशी जोड नक्कीच आहे, असे त्यांनी म्हटले.
ELON MUSK: “My partner Shivon is half Indian, and one of my son’s middle name is ‘sekhar’ after the Indian physicist, Professor S. Chandrasekhar.” pic.twitter.com/niJWBq6zSa — DogeDesigner (@cb_doge) November 30, 2025
credit : social media and Twitter
एलोन मस्क आणि शिवोन गिलिस यांना 2021 मध्ये जुळी मुले झाली स्ट्रायडर आणि अझ्युर. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची मुलगी आर्केडिया जन्माला आली. अलीकडेच त्यांच्या चौथ्या अपत्याची घोषणा करdत आली असून तिचे नाव ‘सेल्डन लायकुर्गस’ असे आहे. मस्क यांच्या मुलांची नावे यापूर्वीही अनोखी आणि वैज्ञानिक संदर्भ असलेली असल्यामुळे चर्चेत राहिली आहेत, मात्र ‘शेखर’ हे नाव भारतीय शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ देण्यात आल्यामुळे ही बाब विशेष भावनादायी मानली जात आहे.
या घोषणेसोबतच मस्क यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय व्यावसायिकांबद्दल आणि तंत्रज्ञांबद्दलही खुलेपणाने कौतुक केले. “अमेरिकेत आलेल्या भारतीय प्रतिभावान लोकांमुळे या देशाला मोठा लाभ झाला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, उद्योजकता आणि शिक्षण क्षेत्रात भारतीयांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. अमेरिकेच्या प्रगतीत त्यांचा वाटा दुर्लक्षित करता येणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Geopolitics : राजकारण अर्थव्यवस्थेपेक्षा वरचढ, जागतिक व्यवस्थेत मोठे बदल; S. Jaishankar यांनी स्पष्ट केली देशाची भूमिका
मस्क यांची ही वक्तव्ये अशा काळात समोर आली आहेत, जेव्हा अमेरिकेत स्थलांतराच्या धोरणांवर मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या काळात स्थलांतरितांबाबत कठोर भूमिका असल्याचे पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे, निवडणूक काळात मस्क यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता, मात्र काही महिन्यांतच त्यांनी स्वतःला या राजकीय समीकरणांपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर त्यांची भारतीय समुदायावर केलेली स्तुती वैशिष्ट्यपूर्ण आणि अर्थपूर्ण मानली जात आहे. एकूणच पाहता, एलोन मस्क यांचा हा निर्णय फक्त एका मुलाच्या नावापुरता नसून भारताच्या बौद्धिक परंपरेला दिलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील दाद आहे. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे नाव पुढील पिढीपर्यंत अशा प्रकारे पोहोचवणे, हे विज्ञान आणि भारतीय वारशासाठी अभिमानास्पद आहे.
Ans: हे नाव १९८3 च्या नोबेल पारितोषिक विजेता भारतीय-अमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ Subrahmanyan Chandrasekhar यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे.
Ans: नाही. Shivon कॅनडा मध्ये वाढली, तिला लहानपणीच अडॉप्ट करण्यात आले होते. तिचा भारताशी वांशिक संबंध आहे, पण ती भारतात वाढली नाही.
Ans: हा खुलासा Nikhil Kamath यांच्या पॉडकास्ट मध्ये Elon Musk यांनी केला.