फोटो सौजन्य - Social Media
२३ जुलै २०२४ रोजी हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ जाहीर केले गेले आहे. कोणत्या देशाचे पासपोर्ट किती पॉवरफुल आहे? या प्रश्नाचे उत्तर या इंडेक्समधून मिळते. जगातील सगळ्यात पॉवरफुल पासपोर्ट कोणता? याचे उत्तरही सगळ्यांसमोर आले आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२३ अनुसार, गेल्या वर्षी सगळ्यात पॉवरफुल असणारा पासपोर्ट असणारा देश जपान ठरला होता. परंतु, यंदाच्या वर्षी सिंगापूरने पहिली जागा पटकावली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ अनुसार, सिंगापूरचे पासपोर्ट जगातील सगळ्यात पॉवरफुल पासपोर्ट ठरले आहे.
सिंगापूर जगातील सगळ्यात पॉवरफूल पासपोर्ट असलेला देश बनला असून तेथील नागरिक जगातील २२७ डेस्टिनेशनपैकी १९५ ठिकाणी वीजाशिवाय प्रवास करू शकतात. भारताचा यंदाचा क्रमांक गेल्या वर्षीपेक्षा थोडासा निराशाजनक आहे. कारण हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२३ अनुसार, गेल्या वर्षी भारताचा क्रमांक 81वा होता तर यंदाच्या वर्षी भारत ८२ व्या स्थानावर आला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ अनुसार, भारतीय ५८ देशांमध्ये वीजा शिवाय प्रवास करू शकतात. तर गेल्या वर्षी भारतीयांसाठी ती संख्या ६१ अशी होती.
विशेष म्हणजे हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये पहिला क्रमांक बजावणारा सिंगापूर एकटा देश ठरला आहे. या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी फ्रांस, जर्मनी, इटली, जापान आणि स्पेन आहेत, या देशनातील नागरिक १९२ देशांत वीज्याशिवाय प्रवास करू शकतात. तर हीच संख्या तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रिया, फिनलँड, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि स्वीडनसाठी १९१ आहे. १९० च्या संख्येसह चौथ्या स्थानी बेल्जियम, डेन्मार्क, न्यूजीलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि यूके हे देश आहेत. तर १८९ वीज फ्री डेस्टिनेशनसह ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगाल हे दोन्ही देश ५ व्या क्रमांकावर आहेत.