
जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये रविवारी (10 जून) संध्याकाळी ६.१५ वाजता भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या एक तास आधी हा हल्ला झाला. जम्मूच्या रियासी जिल्ह्यात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारत लष्करी कधी ही हल्ला करु शकतात, पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा मोहम्मद फारुख हैदर खान यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत आहे.
अशा परिस्थितीत त्यांनी पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज शरीफ यांच्या सरकारला सतर्क राहण्यास सांगितले आहे. राजा हैदर यांनी सोमवारी रात्री ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की, भारत रियासी हल्ल्याच्या निमित्ताने काश्मीरमध्ये कारवाई करू शकतो. भारताच्या कोणत्याही कारवाईसाठी पाकिस्तानने पूर्णपणे तयार असले पाहिजे.
रविवारी (9 जून) संध्याकाळी जम्मूच्या रियासीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी कटरा येथून रानसू भागातील शिव खोरी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला, त्यामुळे बस खोल दरीत कोसळली. या हल्ल्यात किमान दहा जणांचा मृत्यू झाला आहे. रियासी एसएसपी मोहिता शर्मा यांनी ही घटना दहशतवादी हल्ला असल्याची पुष्टी केली. हल्ल्यानंतर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्तपणे बचाव मोहीम राबवली आणि जखमींना उपचारासाठी जम्मूच्या जीएमसीमध्ये नेण्यात आले.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी हल्ला
रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याचवेळी जम्मूमध्ये हा हल्ला झाला, त्या वेळी दिल्लीत शपथविधी सोहळ्याला देशातील सर्व मोठे नेते उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या काही तास आधी हा हल्ला झाला. भारत सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
अचानक गोळ्यांचा पाऊस सुरू झाला, असे दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. या हल्ल्यात बस चालकालाही गोळी लागली आणि बस खड्ड्यात पडली. बस खड्ड्यात पडली नसती तर दहशतवाद्यांनी क्वचितच कोणाला जिवंत सोडले असते, असे जखमींचे म्हणणे आहे. या हल्ल्यात 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि प्रशासकीय पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी 200 फूट खोल दरीत कोसळलेल्या बसमधील लोकांना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात पाठवले.