Israel News : नेतन्याहू यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळण्याची शक्यता; भ्रष्टाचार प्रकरणातील गंभीर आरोप मागे घेण्याची न्यायाधीशांची शिफारस

इस्रायलमधील न्यायालयाने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावरील सर्वात गंभीर भ्रष्टाचार प्रकरणातील आरोप मागे घेण्याची शिफारस केली आहे. दुसऱ्या प्रकरणातही पुराव्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या शिफारशी अंतिम नसून सरकारी वकिलांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो सौजन्य AI
Netanyahu relief news फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • केस ४००० मध्ये पुरावे कुमकुवत; लाचखोरीच्या आरोप मागे घेण्याची सूचना

  • दुसऱ्या प्रकरणातही न्यायालयाचे प्रश्न

  • अंतिम निर्णय सरकारी वकिलाकडे

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी भ्रष्टाचार प्रकरणात दिलासादायक घडामोड समोर आली आहे . त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या सर्वात गंभीर आरोपांपैकी काही आरोप काढून टाकण्याची शिफारस इस्रायली न्यायाधीशांनी केल्याचे समोर आले आहे .

या घडामोडीमुळे दीर्घकाळापासून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत नेतन्याहू यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मात्र आरोप मागे घेण्याची शिफारस म्हणजे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे . असा याचा अर्थ होत नाही . या प्रकरणातील अंतिम निर्णय आणि पुढील न्यायालयातील प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे .

केस ४००० मध्ये पुरावे कुमकुवत; लाचखोरीच्या आरोप मागे घेण्याची सूचना

नेतन्याहू यांच्यावरील सर्वात गंभीर प्रकरण केस ४००० म्हणून ओळखले जाते . या प्रकरणात त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील कंपनी बेझेकला सुमारे १.८ अब्ज शेकेलचे नियामक फायदे मिळवून दिल्याचा आरोप आहे . त्याबदल्यात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बाजूने एका वृत्तसंस्थेवर सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा करण्यात आला होता .

मात्र न्यायाधीशांनी या प्रकरणातील पुराव्यांबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या . खासकरून सरकारी साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे . त्यामुळे या प्रकरणातील आरोप मागे घेण्याचा विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे .

फोटो सौजन्य AI
Israel : इस्रायलमध्ये सत्तांतराची नांदी! आयझेनकोट आणि गोलान यांच्यात युती; अरब पक्ष 'रा'आम'ही सरकारमध्ये सामील होणार?

दुसऱ्या प्रकरणातही न्यायालयाचे प्रश्न

नेतन्याहू यांच्या विरोधात केस २००० नावाचे आणखी एक प्रकरण सुरु आहे . यामध्ये त्यांनी येडीओथ अहरोनोथ या वृत्तपत्रकाचे प्रकाशक अर्नोन मोझेस यांच्याशी सकारात्मक प्रसिद्धीच्या बदल्यात प्रतिस्पर्धी वृत्तपत्राला अडचणीत आणणारा कायदा करण्याबाबत चर्चा केल्याचा आरोप आहे . पण अशा चर्चेला गुन्हा म्हणता येईल का , याबाबत न्यायाधीशांनी प्रश्न निर्माण केले .

या प्रकरणातील आरोपांचा फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे . दरम्यान केस १००० मध्ये श्रीमंत व्यावसायिकांकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे . या प्रकरणाचा निकाल लवकर लावण्यासाठी दोन्ही बाजुंना तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा ,असेही न्यायालयाने सुचवले आहे .

फोटो सौजन्य AI
World News : POEC संघटनेला अमेरिकेचा मोठा धक्का; व्हेनेझुएला आणि इराकला बाहेर पडण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा दबाव

अंतिम निर्णय सरकारी वकिलाकडे

न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर नेतन्याहू यांनी समाधान व्यक्त केले आहे . त्यांनी या घडामोडीला सत्य आणि न्यायासाठी आशेचा किरण असे संबोधले . तसेच तपास यंत्रणांनी आपल्या जवळच्या लोकांवर दबाव टाकल्याच्या आरोपही केला . मात्र नेतन्याहू यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याची भूमिका कायम ठेवली आहे .

इस्रायलच्या अटर्नी जनरल गाली बहराव - मियारा यांनी न्यायालयाच्या सूचनांचा सरकारी वकिलांसोबत विचार केला जाईल , असे स्पष्ट केले आहे . खास बाब म्हणजे न्यायाधीशांच्या शिफारशी म्हणजे अंतिम निकाल नाही किंवा नेतन्याहू यांची निर्दोष मुक्तता नाही . त्यामुळे आता सरकारी वकिलांचा निर्णय आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे .