Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम

या महिन्याच्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेली आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेली जैश-ए-मोहम्मद ही संघटना जमात उल-मुमिनत नावाची महिला ब्रिगेड तयार करण्याची तयारी करत असल्याचे उघड झाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 22, 2025 | 07:44 PM
Jaish e mohammed:

Jaish e mohammed:

Follow Us
Close
Follow Us:
  •  जैश-ए-मोहम्मदचा नवा उपक्रम
  • महिला सदस्यांच्या भरतीसाठी नवा कोर्स
  • प्रत्येक सहभागीकडून ५०० रुपये फी आकारणार

Jaish-E-Mohammad :  पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने, जैश-ए-मोहम्मदने, एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जैश ए मोहम्मद संघटनेत महिला सदस्यांची भरती करण्यात येणार आहे. पण या भरतीपूर्वी महिलांना एक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. जैश-ए-मोहम्मदने दहशतवादी संघटनेने जमात अल-मोमिनत नावाची महिला जिहादी ब्रिगेड तयार केली आहे. संघटनेत महिलांची भरती करण्यासाठी तुफत अल-मोमिनत हा ऑनलाइन जिहादी कोर्सदेखील सुरू केला आहे. मसूद अझहरच्या बहिणी आणि उमर फारूकची पत्नी त्याचे नेतृत्व करणार आहेत. या कोर्ससाठी प्रत्येक सहभागीकडून ५०० रुपये फीदेखील आकारण्यात आली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेली आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेली जैश-ए-मोहम्मद ही संघटना जमात उल-मुमिनत नावाची महिला ब्रिगेड तयार करण्याची तयारी करत असल्याचे उघड झाले.  अशातच काही महत्त्वाची कागदपत्रेही  गुप्तचर संस्थांच्या हातील लागली आहेत.  ही संघटना महिलांची भरती करण्यासाठी आणि निधी उभारण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील चालवत आहे. या अभ्यासक्रमाला तुफत अल-मुमिनत असे नाव देण्यात आले आहे.

Bihar Elections 2025:  चिराग पासवानच्या मनात मुख्यमंत्री पदाची खुर्ची; बिहारच्या राजकारणात येणार ट्वीस्ट?

मसूद अझहरच्या बहिणी नेतृत्व करतील

मौलाना मसूद अझहर याने महिला ब्रिगेडची कमान त्यांची बहीण सादिया अझहर हिच्याकडे सोपवली आहे. सादियाचा पती युनूस अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेला. त्यानंतर त्याने बहिण त्यांची धाकटी बहीण सफिया आणि उमर फारूक यांची पत्नी आफ्रिरा फारूक यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. उमर फारूक पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता आणि नंतर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला.

या कोर्समध्ये काय शिकवले जाईल?

संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि महिला ब्रिगेडमध्ये अधिक महिलांची भरती करण्याच्या उद्देशाने, जैश-ए-मोहम्मदच्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य, ज्यात मसूद अझहर आणि त्याच्या कमांडरांचे नातेवाईक यांचा समावेश आहे, महिलांना जिहाद, धर्म आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल शिकवल्या जाणार आहेत.

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral

४० मिनिटांचे लेक्चर

भरती मोहीम ८ नोव्हेंबर पासून ऑनलाइन लाईव्ह व्याख्यानांद्वारे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज ४० मिनिटांच्या ऑनलाइन सत्रांमध्ये, मसूद अझहरच्या दोन्ही बहिणी, सादिया अझहर आणि समायरा अझहर, महिलांना जैशच्या महिला शाखेत, जमात उल-मुमिनतमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतील.

महिलांकडून देणग्या गोळा करणार

या उपक्रमाच्या माध्यमातून मसूद अझहरने देणग्या गोळा करण्याची संधीही सोडलेली नाही. ७ सप्टेंबर रोजी बहावलपूरमधील मरकझ उस्मान ओ अली येथे केलेल्या अलीकडील भाषणातही त्याने देणग्यांसाठी आवाहन केले होते. त्याचप्रमाणे जैश-ए-मोहम्मद आता या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महिलेकडून ५०० पाकिस्तानी रुपयांची देणगी गोळा करत आहे आणि त्यांना ऑनलाइन माहिती फॉर्म भरण्यास सांगितले जात आहे.

‘खान’ आडनावामुळे सरफराजला दुर्लक्षले? काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांचा गौतम ‘गंभीर’वर निशाणा, पोस्टमुळे खळबळ

महिलांचे ब्रेनवॉश करण्यासाठी रॅली

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटना खवळल्या आहेत. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन रॅलीद्वारे नवीन जिहादींची भरती करत आहेत. जैशच्या अशाच एका रॅलीच्या तयारीचा व्हिडिओ समोर आला आहे. ही रॅली मुझफ्फराबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये स्टेज कसा सजवला आहे, भिंतींवर पोस्टर लावलेले आहेत हे दाखवण्यात आले आहे.

या पोस्टर्समध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालय, मरकझ सुभान अल्लाह मशिदीवरील ऑपरेशन सिंदूरवरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद म्हणून वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक भिंतीवर जिहादचे पोस्टर्स लावलेले आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की ही रॅली विशेषतः महिलांना जैशमध्ये भरती करण्यासाठी आयोजित केली जात आहे. जिहादी प्रवचनांनी त्यांचे ब्रेनवॉशिंग केले जाणार नाही तर जिहादच्या नावाखाली देणग्यांसाठी खंडणी देखील घेतली जाईल.

महिला ब्रिगेडची घोषणा

या महिन्याच्या सुरुवातीला, ८ ऑक्टोबर रोजी मसूद अझहरने जैश-ए-मोहम्मदच्या महिला ब्रिगेड — ‘जमात उल-मुमिनत’ — ची घोषणा केली. त्यानंतर १९ ऑक्टोबरला रावलकोट (पी.ओ.के.) येथे ‘दुख्तरान-ए-इस्लाम’ या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमाचा उद्देश महिलांची गटात भरती करणे हा आहे. पाकिस्तानमधील कडक सामाजिक नियमांमुळे अनेक भागात महिलांसाठी एकट्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे कलंकासारखे समजले जाते; याचा फायदा घेऊन जैश-ए-मोहम्मद आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून महिलांची भरती करत असल्याचे नोंदवले जात आहे. अशी नोंदी किंवा आशंका आहे की हे पथ्य पुढे नेऊन ते ISIS, हमास आणि LTTE या संघटनांच्या रचनेप्रमाणे महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत — पुरुषांच्या दहशतवादी ब्रिगेडसोबत समांतरपणे या ब्रिगेडचा उपयोग आत्मघातकी/फिदायीन हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो.

Web Title: Jaish e mohammed course to become a terrorist of jaish e mohammed masood azhar has prepared the curriculum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

‘तणावामागे भारताचा हात’ हे पाकिस्तानचे आरोप ‘निराधार’; अफगाणिस्तानचे सडेतोड उत्तर, म्हणाले – ‘बेताल बडबड…’
1

‘तणावामागे भारताचा हात’ हे पाकिस्तानचे आरोप ‘निराधार’; अफगाणिस्तानचे सडेतोड उत्तर, म्हणाले – ‘बेताल बडबड…’

BLA Attack on Pakistan: तालिबानशी सामंजस्य करारानंतर BLA चा पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर हल्ला; सात सैनिक ठार
2

BLA Attack on Pakistan: तालिबानशी सामंजस्य करारानंतर BLA चा पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर हल्ला; सात सैनिक ठार

आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश
3

आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश

सौदी अरेबियाकडून पाकिस्तान-अफगाणिस्तानला शांततेचा सल्ला; युद्धविराम कायम ठेवण्याचे आवाहन
4

सौदी अरेबियाकडून पाकिस्तान-अफगाणिस्तानला शांततेचा सल्ला; युद्धविराम कायम ठेवण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.