Jeff Bezos trolled for wedding card Money can't buy class
Jeff Bezos wedding invite roasted : अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेझोस लवकरच आपल्या मंगेतर लॉरेन सांचेझ हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, त्यांच्या आलिशान लग्नाची चर्चा सुरू असतानाच, त्यांच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेवरून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले आहे. मुलामुलींप्रमाणे बेझोस आणि सांचेझ गेल्या सहा वर्षांपासून एकत्र असून, आता त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत रूप देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांचेही लग्न इटलीतील व्हेनिस शहरात होणार असून, हे लग्न अत्यंत खासगी व भव्य स्वरूपाचे असणार आहे. मात्र, सोशल मीडियावर सध्या जे चर्चेत आहे, ते म्हणजे बेझोसच्या लग्नपत्रिकेचा दर्जा.
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाचे आमंत्रण सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एक युजर एलिझाबेथने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “हे मायक्रोसॉफ्ट पेंटवर बनवले आहे का?” तर दुसऱ्या युजर मार मॅकने लिहिले, “पैशाने वर्ग किंवा चव खरेदी करता येत नाही.” जगभरातील अरबपतींपैकी एक असूनही, अशा साध्यासुध्या आणि डिझाइनहीन लग्नपत्रिकेमुळे सोशल मीडियावर ‘पैशाने सर्वकाही मिळत नाही’ हा विचार पुन्हा चर्चेत आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘काका पूर्वीसारखे राहिलेले नाहीत’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह? पुतण्या फ्रेड ट्रम्प यांचा ‘खळबळजनक’ दावा
जेफ बेझोस हे 61 वर्षांचे आहेत, तर लॉरेन सांचेझ 55 वर्षांची आहे. सांचेझ या व्यवसायाने पत्रकार असून, त्या अमेरिकेत लोकप्रिय न्यूज अँकर म्हणून ओळखल्या जातात. दोघांचे नाते अनेक वर्षांपासून चर्चेत असून, 2023 मध्ये बेझोसने तिला अत्यंत महागडी प्लॅटिनम डायमंड रिंग देत प्रपोज केले होते. ही अंगठी 3-4 दशलक्ष डॉलर्सची असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर त्यांनी एक भव्य प्री-एंगेजमेंट पार्टी आयोजित केली होती. आता हे युगुल विवाहबद्ध होत असून, जगभरातील श्रीमंत आणि नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
बेझोस यांच्या लग्नाची भव्यता ही निव्वळ आमंत्रणपत्रिकेपुरतीच मर्यादित नाही. त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी 90 खासगी जेट विमानं आणि 30 वॉटर टॅक्सी सज्ज करण्यात आल्या आहेत. सर्व पाहुण्यांना व्हेनिस शहराच्या नदीमार्गे लग्नस्थळी नेण्यात येणार आहे. याशिवाय, त्यांच्यासाठी ग्लॅमरस आणि आलिशान हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत, ज्यामध्ये ग्रिटी पॅलेस, सेंट रेजिस, बेलमंड सिप्रियानी आणि हॉटेल डॅनिएली यांचा समावेश आहे. संपूर्ण विवाह सोहळा एकदम खासगी ठेवण्यात येणार असून, सुरक्षा व्यवस्थेचीही चोख तयारी करण्यात आली आहे. विशेष पाहुण्यांसाठी व्यक्तिगत योजना आणि खास मेनू तयार करण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चिनी ड्रॅगनचा विस्तारवाद पुन्हा सक्रिय; तैवान, फिलीपिन्सनंतर आता जपान धोक्यात, भारतासाठी संधीचा क्षण?
जेफ बेझोस यांचे लग्न हे एक अलौकिक आणि भव्य आयोजन ठरणार आहे. मात्र, त्यांच्या लग्नपत्रिकेचा दर्जा पाहून सामान्य लोकांप्रमाणेच अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असूनही, डिझाइनच्या बाबतीत त्यांनी साधेपणाची निवड केल्यामुळे ही टीका अधिक तीव्र झाली. पैशाने सर्व काही खरेदी करता येत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, मात्र सोशल मीडियावरील टीकांमुळे त्यांच्या आलिशान लग्नावर काहीही परिणाम होणार नाही, हे मात्र निश्चित!