Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला; स्फोटकांसह अज्ञात व्यक्तीचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न

ब्राझीलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीच्या सर्वोच्च न्यायालाच्या बाहेर आत्मघाती हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने स्वत:हा स्फोटकांसह न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 14, 2024 | 11:38 AM
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला; स्फोटकांसह अज्ञात व्यक्तीचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न

ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला; स्फोटकांसह अज्ञात व्यक्तीचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

ब्रासिलिया: ब्राझीलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीच्या सर्वोच्च न्यायालाच्या बाहेर आत्मघाती हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने स्वत:हा स्फोटकांसह न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान हा हल्ला झाला अशी माहिती न्यायालातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, G-20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात सुरू होती याच दरम्यान हा हल्ला झाला. या अंतिम टप्प्यात जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थेचे नेते सहभागी होणार होते.

एकामागोमाग दोन स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. या घटनेमुळे ब्राझीलच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिकच कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही घटना सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ घडली. न्यायालयाच्या इमारतीच्या पार्किंग परिसरात पहिला स्फोट झाला. त्यानंतर लगेच काही सेकंदांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या समोर दुसरा स्फोट झाला. तपासादरम्यान घटनास्थळावर मानवी अवशेष सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा- पंतप्रधान मोदींचा ग्लोबल साउथ दौरा; नायजेरिया ते गयाना प्रवास,’हे’ आहे पूर्ण वेळापत्रक

घटनेचा तपास सुरू

या स्फोटाने ब्राझिलियाच्या प्लाझा ऑफ थ्री पॉवर्स या प्रतिष्ठित चौकाच्या आसपास भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात फेडरल सरकारच्या तीन प्रमुख इमारती आहेत. तसेच संशयित आरोपीचा न्यायालयाच्या इमारतीचे नुकसान करण्याचा हेतू असावा, असे मानले जात आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी बॉम्ब शोध पथक तैनात केले आहेत. घटनास्थळाचा सखोल तपास केला जात आहे. तर पोलिस मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

या हल्ल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायालच्या बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. फेडरल डिस्ट्रिक्टच्या व्हाईस गव्हर्नर सेलिना लिओ यांनी प्राथमिक तपासात असे सांगितले की, हल्लेखोराच्या कारमध्येही स्फोटकांचा साठा असावा. हल्लेखोर एकटा असावा, असे लिओ यांनी व्यक्त केले. मात्र, हल्ल्याची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट नाहीत. ब्राझीलसाठी हा हल्ला सुरक्षा व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा मानला जात आहे, विशेषत: आगामी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर.

ब्राझील: G20 शिखर परिषदेत भारताचा सहभाग

पंतप्रधान मोदी 18-19 नोव्हेंबर रोजी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी भारताने G20 परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते. यावेळी ब्राझील या परिषदेचे आयोजन करत आहे. या परिषदेत पंतप्रधान मोदी जागतिक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करतील आणि G20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणेचाही आढावा घेतील. या निमित्ताने ते विविध देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील, ज्यामुळे भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ होतील.

हे देखील वाचा- Israel-Hamas War: इस्त्रायलचे गाझावर विनाशकारी हल्ले; 24 तासांत 46 जणांचा मृत्यू

Web Title: Man with explosives tries to enter brazil supreme court dies in blast nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • Brazil
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
1

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
2

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
3

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.