
कराची : वर्षभरापासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचे सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, उधमपूरमधील हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत.
दोन दिवसांपूर्वी तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो थोडक्यात बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतानाच पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. अदनान अहमद उर्फ हंजला अदनान असे त्याचे नाव असून, तो तोयबाचा दहशतवादी होता.
हंजला हा 2016 मध्ये जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील पंपोर येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यामागचा सूत्रधार होता. या दहशतवादी हल्ल्यात भारताचे आठ जवान शहीद झाले होते. 22 जवान जखमी झाले होते.
हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या
अज्ञाक हल्लेखोरांनी मध्यरात्री रात्री हल्लेखोरांनी हंजला याची चार गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी हल्ला केला तेव्हा इंजला त्याच्या घराच्या बाहेर उभा होता. गोळी लागल्याने हंजाला गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने त्याला गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान 5 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.