तपास यंत्रणानी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून अवैधपणे पोहोचवले जाणाऱ्या मालावर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई चालू आहे. जुलै २०२५ मध्ये या मोहिमेअंतर्गत ३९ कंटेनर जप्त करण्यात आले होते
मुंबई पोलिसांनी शहर आणि राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. धमकीचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून तपास केला जात आहे. आरोपीची चौकशी केली जात असून त्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे.
India vs Pakistan: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देखील, सीमेशेजारील शत्रुराष्ट्र सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.
Operation Sindoor: आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
जम्मू-काश्मीर किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई सुरू केली असून चतरूच्या कुछल भागात भीषण चकमक सुरु आहे. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान २-३ दहशतवाद्यांना घेरलं आहे
पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवाद्यांनी आता ‘क्वाडकॉप्टर’ या छोट्याशा ड्रोनच्या साहाय्याने हल्ले करत पाकिस्तानी सन्याला जेरीस आणलं आहे. पख्तूनख्वा प्रांतात हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
सीरियाच्या राजधानी दमास्कमध्ये रविवारी सकाळी एक भीषण आत्मघाती हल्ला झाला. शहराच्या डवैला परिसरात असलेल्या 'सेंट एलियास चर्च'मध्ये प्रार्थना सभेवेळी झालेल्या या हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
२०२३ च्या मध्यात गोहिलचा अदिती भारद्वाजशी व्हॉट्सअॅपवर संपर्क झाला. त्या महिलेने गोहिलला कच्छ परिसरातील बीएसएफ व नौदलाच्या ठिकाणांची माहिती, फोटो व व्हिडिओ पाठवण्यास प्रवृत्त केले
राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. दोन दिवसांत राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही हा बॉम्ब ब्लास्ट होईल असे या मेलमध्ये म्हटले आहे.
दशहतवादाचा त्याचं वेळी नायनाट होईल, ज्यावेळी लोक आमच्या सोबत उभे राहतील आणि आज मला जाणवतंय की लोक आमच्यासोबत आहेत, असं मत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर, वाघा अटारी सीमेवरून पाकिस्तानी नागरिक त्यांच्या मायदेशात परतत आहेत. आतापर्यंत अनेक नागरिक भारत सोडून गेले आहेत. तर ८४३ भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशदवाद्यांचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर दुखी झालेल्या बदुरियाच्या साबिर हुसैनने इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीएनएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ९० च्या दशकात खोऱ्यात हिंसाचार पसरवण्यात कोणत्या संघटनेची मुख्य भूमिका होती ते जाणून घेऊया.
जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.