न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) टॉयलेट तयार करण्याचे काम हाती घेतले असून, ही सुविधा अंतराळवीरांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात येते. त्यावर तब्बल 189 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. कोणत्याही देशासाठी अंतराळ मोहिमा तयार करणे फार खर्चिक आणि धोकादायक काम असते.
आजकाल आधुनिक तंत्रज्ञान विकासामुळे वैज्ञानिकांना अंतराळात पाठवणे सोपे झाले आहे. परंतु, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे लोक पृथ्वीवर राहून रोज करत असलेल्या कामांसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. ही समस्या म्हणजे अंतराळात किंवा चंद्रावर सकाळचा नैसर्गिक विधी होय. यासाठी वैज्ञानिकांनी काही व्यवस्था केली असली तरी त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने टॉयलेट तयार करण्याचे काम हाती घेतले असून, त्यावर 2 कोटी 29 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 189 कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. या टॉयलेटद्वारे अंतराळवीरांची मोठी समस्या दूर होईल.
शॉर्ट सर्किटची भीती
1960 दरम्यान जेव्हा अंतराळवीरांना पाठवण्यात येते असे. त्यावेळी त्यांना त्यांच्या स्पेससूटमध्येच टॉयलेट करण्याची सूचना होती. परिणामी, शॉर्ट सर्किटची भीती होती. नंतर याला प्लास्टिक बॅगशी जोडण्यात आले. हे सुद्धा सोयीचे नव्हते. आता मात्र नव्या टॉयलेटमुळे ही बाब सोपी होईल. कारण सेक्शनच्या माध्यमातून विष्ठा थेट कंटेनर्समध्ये स्टोअर केली जाणार आहे.