Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानने पुन्हा एकदा मध्ये नाक खुपसलं, तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना पडला वळसा, नक्की झालं तरी काय ?

पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे सांगितलं की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) 100 कर्मचार्‍यांसह विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे असलेली दोन पथके भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. पाकिस्तानने (Pakistan) हेकेखोरी दाखवत तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे भारतीय विमानाला वळसा घालून तुर्कीमध्ये प्रवेश करावा लागला.

  • By साधना
Updated On: Feb 07, 2023 | 04:18 PM
india help to turkey

india help to turkey

Follow Us
Close
Follow Us:

तुर्की (Turkey Earthquake) आणि सीरियामध्ये (Syria Earthquake) भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. या संकट काळात भारतासह जगभरातील अनेक देश तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र पाकिस्ताननं यात पुन्हा एकदा नाक खुपसलं आहे. पाकिस्तानने (Pakistan) हेकेखोरी दाखवत तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे भारतीय विमानाला वळसा घालून तुर्कीमध्ये प्रवेश करावा लागला.(Pakistan Denied Airspace To Indian Aircraft)

भूकंपामुळे तुर्कीमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे 40 हून अधिक धक्के बसले. यामुळे तेथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकले असून बचावकार्य सुरु आहे. मात्र हवामान बदलामुळे यामध्ये अनेक अडथळे येत आहेत.

#TurkeyEarthquake | As per The Associated Press so far 4,600 people have been killed due to powerful earthquakes in Turkey & Syria. Death toll continues to rise amid widespread devastation. India has so far sent two rescue teams to earthquake-marred Turkey. — ANI (@ANI) February 7, 2023

तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी तुर्कीला मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेलने या मदतीनंतर भारताविषयी म्हटले आहे की, ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र.’

[read_also content=”लोकलमध्ये चोरीचा प्रवाशांना आला संशय, दोन तरुणांना प्रवाशांनी घडवली अशी अद्दल, पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/maharashtra/two-persons-beaten-in-csmt-badlapur-local-368018/”]

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीला मदत पाठण्यासाठी एक बैठक झाली. यानंतर तुर्की सरकारच्या समन्वयाने भारतातून एनडीआरएफ, शोध आणि बचाव पथकांसह वैद्यकीय पथक तसेच मदत साहित्यसह तुर्कीसाठी रवाना करण्यात आलं.

पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे सांगितलं की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) 100 कर्मचार्‍यांसह विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे असलेली दोन पथके भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. वैद्यकीय पथके प्रशिक्षित डॉक्टर तसेच अत्यावश्यक औषधांसह पॅरामेडिक्ससह मदतीसाठी तयार आहेत. तुर्की सरकार आणि अंकारा येथील भारतीय दूतावास आणि इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावास कार्यालयाच्या समन्वयाने मदत तुर्कीमध्ये पाठवण्यात आली आहे.

Web Title: Pakistan denied airspace for indian aircraft going to turkey to help earthquake affected persons nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2023 | 04:17 PM

Topics:  

  • pakistan
  • pakistan vs india

संबंधित बातम्या

पाकिस्तानकडून भाईजानचं नाव दशहतवाद्यांच्या यादीत, सलमान खानच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तान चिडला
1

पाकिस्तानकडून भाईजानचं नाव दशहतवाद्यांच्या यादीत, सलमान खानच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तान चिडला

‘शांतता नसेल, तर उघड युद्ध होईल…’; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला ‘ओपन वॉर’ची थेट धमकी
2

‘शांतता नसेल, तर उघड युद्ध होईल…’; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला ‘ओपन वॉर’ची थेट धमकी

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?
3

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम
4

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.