Palestinian supporters Protest in Italy
Italy Protest : रोम : सध्या पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या विषयावरुन आंतरराष्ट्री स्तरावर खळबळ सुरु आहे. फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगालने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे. मात्र इस्रायल आणि अमेरिकेने याला अद्याप होकार दिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांकडून तीव्र आंदोलने सुरु झाली आहे.
इटलीमध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) सरकारविरोधात निदर्शने सुरु झाली आहे. पॅलेस्टिनी समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. या निदर्शनांदरम्यान गाझातील इस्रायलच्या कारवाया तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे. मेलोनी यांनी ही निदर्शने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.
यावेळी निदर्शकांनी इटलीच्या मिलानमध्ये काळे कपडे परिधान करुन मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी निर्शकांना नियंत्रित करण्यासाठी लाठीमार केला. यामुळे आंदोलन अधिक संतापले. लोकांनी शहरातील अनेक रेल्वे स्थानकांवर आग लावली आणि मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. तसेच सरकार इमारती आणि मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे.
निदर्शकांच्या हिंसक आंदोलनामुळे अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इटलीची राजधानी रोममध्ये तसचे मिलानमध्ये पोलिस आणि निदर्शकांमध्ये चकामकही झाली. यावेळी ६० हून अधिक पोलिस अधिकारी जखमी झाले. निदर्शकांनी शहाराच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकांवर हल्ले केले आहेत.
अनेक ठिकाणी गाड्यांना अडवून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या हिंसक निदर्शनांमुळे इटलीतील बंदर शहर नेपल्समध्येही निदर्शकांनी रस्ते रोखण्याचा आणि रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर केला.
या देशांनी पॅलेस्टाईनाला दिली स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता
भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि सौदी अरेबियासह आतापर्यंत १५२ देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिला आहे. पण इस्रायल, इटली अमेरिका आणि जपान यांसारख्या काही देशांनी याला नकार दिला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणाऱ्या देशावर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या देशांवर दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
इटलीमध्ये का सुरु आहेत निदर्शने?
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली जात आहे. याला इटलीने मान्यता दिलेली नाही. यामुळे इटलीत पॅलेस्टिनी समर्थकांची निदर्शने सुरु आहेत.
पॅलेस्टिनी समर्थकांनी इटलीत कुठे सुरु आहेत निदर्शने?
पॅलेस्टिनी समर्थकांनी इटलीची राजधानी रोममध्ये तसेच मिलानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने सुरु आहेत.
निदर्शनांत किती जीवितहानी झाली?
इटलीत सुरु असलेल्या निदर्शनांत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही, पण पोलिस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या चकामकीत ६० हून अधिक पोलिस जखमी झाली आहेत.
‘भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचा’ ; जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर मार्को रुबियो यांचे महत्त्वपूर्ण विधान