भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो (फोटो सौजन्य: एक्स अकाऊंट/ @SecRubio)
Marco Rubio and S. Jaishnkar Meet : वॉशिंग्टन : सोमवारी (२२ सप्टेंबर) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची न्यूयॉर्कमध्ये भेट झाली. ही भेट अमेरिका आणि भारताच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झाली. शिवाय याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी H-1B व्हिसावरी शुल्क १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत वाढवला आहे. पण यामुळे सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. अशा परिस्थिती दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीनंतर रुबियो यांनी भारताबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि भारतामधील आर्थिक संबंध, स्थिर करण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला.
यावेळी मार्के रुबियो यांनी म्हटले की, भारत हा अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील संरक्षण, व्यापार, उर्जा, औषधनिर्मिती आणि खनिज क्षेत्रातील भागीदारी अत्यंत महत्वाची आहे. तसेच भारत हा अमेरिकेसाठी धोरणात्मक दृष्टीकोमातून अधिक महत्त्वाचा आहे. यामुळे दोन्ही देशांनी इंडो पॅसिफिक प्रदेशात आणि क्वाड अलायन्समध्ये एकत्रपण काम करणे गरजेचे आहे.
Met with Indian External Affairs Minister @DrSJaishankar at UNGA. We discussed key areas of our bilateral relationship, including trade, energy, pharmaceuticals, and critical minerals and more to generate prosperity for India and the United States. pic.twitter.com/5dZJAd85Za — Secretary Marco Rubio (@SecRubio) September 22, 2025
दरम्यान या बैठकीनंतर एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही भारत आणि अमेरिकेतील अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देशांतील प्रगतीसाठी नियमितपणे संपर्क राखण्यावर भर दिला.
Good to meet @SecRubio this morning in New York. Our conversation covered a range of bilateral and international issues of current concern. Agreed on the importance of sustained engagement to progress on priority areas. We will remain in touch. 🇮🇳 🇺🇸 pic.twitter.com/q31vCxaWel — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 22, 2025
FAQs(संबंधित प्रश्न)
भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली?
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची काल संयुक्तर राष्ट्राच्या महासभेत बैठक झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा स्थिर करण्यावर चर्चा केली.
मार्को रुबियो यांनी भारताबद्दल काय म्हटले?
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत हा धोरणात्मक दृष्टीकोनातून अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स