G-7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रुप ऑफ ७ म्हणजेच जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत जगातील सात प्रमुख देश – अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि इटली यांचा समावेश आहे. कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेतील. पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि मेक्सिकन अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांची भेट घेतील. येथे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीचे पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी, जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनाही भेटतील.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रात्री कॅलगरी येथे पोहोचले. जिथे ते कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. गेल्या दशकात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. पंतप्रधान मोदी १६-१७ जून रोजी काननास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सलग सहाव्यांदा सहभागी होत आहेत.
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
रविवारी, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदी यांचे लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळानंतर सायप्रसला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींच्या भेटीदरम्यान, त्यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ प्रदान करण्यात आला. रविवारी पंतप्रधानांनी व्यावसायिकांसोबत झालेल्या गोलमेज बैठकीत भाग घेतला ज्यामध्ये सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष देखील उपस्थित होते. उद्योगपतींना संबोधित करताना मोदींनी भारत आणि सायप्रसमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये “वाढीची प्रचंड क्षमता” अधोरेखित केली.
10 देश जेथील खाण्याच्या नियमांविषयी ऐकून मन हेलावेल; शाकाहारी झाल्यास मिळते कठोर शिक्षा
जी-७ शिखर परिषदेचा पहिला दिवस खूप छान होता. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना झाले. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प आता भेटू शकणार नाहीत. ट्रम्प यांच्या पुनरागमनाबद्दल माहिती देताना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अध्यक्ष ट्रम्प यांनी जी-७ शिखर परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली आणि प्रमुख व्यापार करारांवर स्वाक्षरी केली. तथापि, मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राष्ट्रप्रमुखांसोबत जेवण करू शकले नाहीत.
पंतप्रधान मोदींच्या कॅनडा दौऱ्याबद्दल कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन म्हणाले की, खलिस्तानवरील कारवाई आणि भारतासोबतचा व्यापार एकमेकांशी जोडलेला आहे. कॅनडाचा इतर प्रत्येक देशाशी असलेला व्यापार याच्याशी जोडलेला आहे. समजा, तुमच्या बंदरांमध्ये एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना कार्यरत आहे आणि तुमच्या देशात रसद पोहोचवत आहे, जसे खलिस्तानी ट्रकिंग उद्योगातून ड्रग्जची वाहतूक करतात. त्या बाबतीत, आर्थिक आणि व्यवसायिकदृष्ट्या ही एक खरी समस्या आहे. जर कॅनडाला जागतिक स्तरावर एक खेळाडू व्हायचे असेल, तर आपल्याला खलिस्तानवाद्यांबद्दल काहीतरी करावे लागेल कारण हे लोक कॅनडाच्या सामाजिक रचनेचे मोठे नुकसान करत आहेत आणि त्यासाठी त्यांना मोठी आर्थिक किंमतही मोजावी लागत आहे. आमच्या व्यवस्थेत त्यांचा सहभाग आमच्यासोबत व्यवसाय करू इच्छिणाऱ्या देशांमध्ये आमची विश्वासार्हता कमी करेल.