• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Demand To Cancel Chief Minister Devendra Fadnavis Mla Status Result Reserved

Devendra Fadanavis News: मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी; निकाल राखीव

गुडधे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहून ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेवरील स्वाक्षऱ्या संबंधित लिपिक आणि नोंदणी अधिकाऱ्यांसमोर केल्या होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 17, 2025 | 08:38 AM
Devendra Fadanavis News: मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी; निकाल राखीव

ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त; फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nagpur Politics: दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड अवैध ठरवून आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी   काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी केली आहे.  त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात  निवडणूक याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर गुडधे यांच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला असून, त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखूव ठेवला आहे. या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या याचिकेवर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद सादर करण्यात आले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी याचिकेला जोरदार विरोध दर्शवला आहे. निवडणूक याचिका दाखल करताना खुद्द उमेदवाराची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, याचिकाकर्ते गुडधे स्वतः गैरहजर होते, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद फडणवीस यांचे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी यापूर्वीच्या सुनावणीत केला होता. सध्या या याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखीव ठेवला असून, त्याकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल देशांच्या संघर्षादरम्यानच अमेरिकेचं मोठं पाऊल; इंधन देणारी टँकर विमानं…

त्यानंतर न्यायालयाने गुडधे यांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची संधी दिली होती. या अनुषंगाने सोमवारी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी गुडधे यांच्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ मेहमूद प्राचा यांनी युक्तिवाद सादर केला. गुडधे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहून ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेवरील स्वाक्षऱ्या संबंधित लिपिक आणि नोंदणी अधिकाऱ्यांसमोर केल्या होत्या. मात्र, त्याच दिवशी सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

५ जानेवारी २०२५ रोजी रविवार होता, तर त्यानंतर ६ जानेवारीला गुडधे काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे त्या दिवशी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया त्यांच्या वकिलांनी पूर्ण केली, असे युक्तिवादात नमूद करण्यात आले. या युक्तिवादात ॲड. मेहमूद प्राचा यांना ॲड. आकाश मून आणि ॲड. पवन डहाट यांचे सहकार्य लाभले.

रेशनच्या तांदळाचा गोरखधंदा; शासकीय योजनेच्या लाभावर धनदांडग्यांचा डोळा

याशिवाय, दक्षिण नागपूरमधून विजयी झालेल्या गिरीश पांडव यांच्याविरुद्ध, चिमूर (चंद्रपूर) येथून निवडून आलेल्या भांगडिया यांच्याविरुद्ध सतीश वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंग रावत आणि राजुरा मतदारसंघातून निवडून आलेल्या भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकाही समान निकषावर फेटाळाव्यात, अशी मागणी युक्तिवादादरम्यान करण्यात आली. दरम्यान, या सर्व याचिकांवरील निकाल न्यायालयाने सध्या राखून ठेवला आहे.

Web Title: Demand to cancel chief minister devendra fadnavis mla status result reserved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • Nagpur Politics

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Feb 17, 2026 | 02:58 PM
मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

Feb 17, 2026 | 02:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.