
भारत ईव्ही आणि संरक्षण क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक
मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये दिली मंजूरी
चीनची दादागिरी लवकरच संपणार
आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कॅबिनेट मीटिंगमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. ईव्ही आणि संरक्षण क्षेत्रासाठी भारत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘रेअर अर्थ’ची जगभरात सध्या मोठी मागणी आहे. ईव्ही आणि संरक्षण क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यावर सध्या चीनचे वर्चस्व आहे. तेच मोडून काढण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. Rare Earth Magnet मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Cabinet approved first-of-its-kind Rare Earth Permanent Magnets (REPM) Scheme, to achieve Aatmanirbharta in permanent magnet manufacturing.
➡️ ₹7,280 Cr incentive | 7-year duration ✅ End-to-end value chain: oxides → metals → alloys → finished REPMs
✅ Total capacity:… pic.twitter.com/oiQ9ltaKhi — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) November 26, 2025
मोदी सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये Rare Earth Magnet मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकार 7 हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. यामुळेच नक्कीच चीनच्या दादागिरीला लगाम बसणार आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. भारत सरकार ईव्ही, संरक्षण क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी मदत होणार आहे.
चीनने निर्बंध लादले
भारताची विस्तार योजना अशा वेळी आली आहे जेव्हा जगभरातील देश चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीन जगातील रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनांपैकी सुमारे ९०% उत्पादन प्रक्रिया करतो. एप्रिलमध्ये, अमेरिकेसोबतच्या व्यापार तणावादरम्यान, चीनने अनेक निर्यात निर्बंध लादले. चीनने आता काही अटींसह निर्यातीला परवानगी दिली आहे, परंतु भारत सरकार देशाला स्वावलंबी बनवायचे आहे आणि कोणत्याही एका देशावर पूर्णपणे अवलंबून राहू नये असे वाटते.
भारताला अनेक देशांकडून पाठिंबा
भारताच्या योजनेनंतर, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युनायटेड किंग्डम (यूके) आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमधील अनेक दुर्मिळ पृथ्वी ऑक्साईड पुरवठादारांनी भारताला पुरवठा करण्यास सहमती दर्शविली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, “आम्ही काही रेअर अर्थ मॅग्नेट पुरवठादारांशी प्राथमिक चर्चा केली आहे. ते पुरवठा करण्यास तयार आहेत.”
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ४ महत्त्वाचे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणणारे एकाच वेळी चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मोदी सरकारने एकूण १९,९१९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या जनतेसाठी खास भेट आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती दिली. पुणे मेट्रोचा विस्तार, रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादन योजना आणि रेल्वेच्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.