फोटो सौजन्य AI
पाकिस्तानने जबरदस्ती POK तर आपल्या ताब्यात ठेवला पण तोच POK आता पाकिस्तानच्या सरकारला नाकी नऊ आणत आहे . आणि का म्हणून आणू नये . फक्त धर्म धर्म आणि भारता विरोधी राग आवळल्याने तुम्ही एकदा दोनदा जनतेला मूर्ख बनवू शकाल पण तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा तुमच्या कामाला येणार नाहीत . सरते शेवटी माणसाला लागणाऱ्या मूलभूत गरजाही लोकांना मिळाल्या नाहीत जीवन अवघड झालं तर बंड हे होणारच .
POK मधील विधान सभेत १२ जागा या राखीव आहेत . या जागा पाकिस्तानमधील स्थायिक झालेल्या निर्वासित काश्मिरींसाठी राखीव आहेत . JAAC यांचा असा आरोप आहे कि या जागांचा वापर हा इस्लामाबादकडून POK मध्ये सरकारवर वर्चस्व ठेवण्यासाठी केला जातोय . त्यामुळे आंदोलन आता राजकीय स्वायत्तता ,स्थानिक प्रतिनिधित्व , आणि पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला विरोध या मुद्द्यांवर गेले आहे .
पाकिस्तान कडून प्रत्येक मार्गाने होणारी गळचेपी आता POK मधील नागरिकांनी ओळखली असून ते आता त्याला कडाडून विरोध करत आहेत . त्यासाठी त्यांनी राखीव १२ जागा रद्द करण्याची मागणी केली आहे .
Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनाच्या दिवशी POK मध्ये आंदोलन सुरूच होते . त्या दिवसानिमित्त तरी जगभरात JAAC च्या आंदोलनाची दखल घेतली जाईल असा त्यांचा हेतू होता . त्यासाठी त्यांनी जगभरात राहणाऱ्या काश्मिरी लोकांना आवाहन करून जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करायला सांगितले होते . त्याप्रमाणे जगभरात छोट्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली सुद्धा , पण त्याची चर्चा मात्र जागतिक पटलावर तीव्रतेने झाली नाही . असे राजकीय जाणकार सांगतात . पण या निमित्ताने आंदोलन आंतरराष्ट्रीय करण्यासाठीचा प्रयत्न झाला हे नाकारता येत नाही .
पाकिस्तान सरकारला आपल्या जनतेची काळजी घेणे व्यवस्थित जमत नसताना POK ताब्यात घेऊन तेथील लोकांची सुद्धा ससेहोलपट केली . किंबहुना सुरु आहे . पाकिस्तानवर वाढते कर्ज , गरिबी , बेरोजगारी , महागाई , अधून मधून होणारे बॉम्बस्फोट यावर सरकार त्रस्त असताना POK मधील आंदोलने , संघर्ष चिंतेचा विषय बनले आहेत .
या संघर्षात बऱ्याचदा हिंसा देखील घडली आहे . अमानुष असा सैन्याचा वापर सुद्धा केला गेला आहे . पण आता POK मधील नागरिक पाकिस्तानपासून वेगळे झाल्याशिवाय हा संघर्ष थांबेल असे सध्या तरी राजकीय विश्लेषकांना वाटत असल्याचे बोलले जात आहे .






