Presidential elections in Poland Karol Nawrocki wins Poland presidential elections
वॉर्सा: पोलंडमध्ये नुकत्याच अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत रुढिवादी नेता करोल नॉरोकी यांनी दणदणीत विजय मिळवला. सोमवारी (२ जून) अंतिम मतमोजणी झाली. यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, कॅरोल नॉरोकी यांना ५०.८९ टक्के मते मळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोव्स्की यांना ४९.११ टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीत उदारमतवादी ईयू समर्थक राफल ट्राझास्कोव्स्की विरोधात रुढीवादी इतिहासकार कॅरोल नॉरोकी यांच्यात जोरदार लढत झाली. कॅरोल नॉरोकी हे उजव्या विचारसरणीचे आहेत. यामुळे त्यांना उजव्या विचारसरणीच्या कायदा आणि न्याय पक्षाचा पाठिंबा मिळाला.
दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक पोलंडमध्ये सुरु जाली. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरमध्ये चुरशीची लढत झाली. याने लढतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतेले. रविवारी संध्याकाळी सुरुवातीच्या एक्झिट पोल जाहीर करण्यात आला. यावरुन राफल ट्राझास्कोव्स्की हे कॅरोल नॉरोकी यांच्या पुढ होते. पण काही तासानंतर हे चित्र बदलले. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर पोलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी कॅरोल नॉरोकी यांची निवड झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कॅरोल नॉरोकी यांना पाठिंबा दर्शवला होता.
सोमवारी राफल ट्राझास्कोव्स्कीने पराभव मान्य केला. तसेच त्यांनी दणदणीत विजयाबद्दल नॉवरोकीचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या सर्व मतदारांचेही आभार मानले. त्यांनी म्हटले की, “मी एक मजबूत, सुरक्षित, प्रामाणिक आणि दयाळू पोलंड तयार करण्यासाठी लढलो.” पोलंडबद्दल माझा दृष्टीकोन मी बहुसंख्य नागरिकांपर्यंत पोहचवू शकलो नाही याचे मला वाईट वाटते.
याच वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी कॅरोल नॉरोकी यांचे अभिनंदन केले. पोलंड हा युक्रेनचा महत्त्वपूर्ण शेजारी देश आहे. तसेच हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी देखील नॉरोकी यांच्या विजयाचे कौतुक केले.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन जेर लेयन यांनी देखील कॅरोल यांनचे अभिनंदन केले. त्यांनी लोकशाही मुल्यांवर आधारित ईयू-पोलंड सहकार्यावर भर दिला.
कॅरोल नॉरोकी सध्या राष्ट्राध्यक्ष आंद्रेज दुदा यांची जागा घेतील. आंद्रेज दुदा हे देखील एक रुठीवाढी नेता म्हणून ओळखले जातात. त्यांचा दुसरा आणि शेवटचा कार्यकाळ ६ ऑगस्ट रोजी संपणार आहे. पोलिश संविधानानुसार, राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. पोलिंडच्या राजकीय व्यवस्थेतील बहुतेक सत्ता पंतप्रधानांकडे असते. पंतप्रधानांची निवड संसदेद्वारे केली जाते. पोलंडच्या राष्ट्रपतींना परराष्ट्र धोरण आणि व्हेटो कायद्याचा अधिकार असतो.