Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीरियातील सत्तापालटासाठी इराणला रशियाचा पाठिंबा; खामेनेई यांच्या दाव्याला मिळाली पुष्टी

सीरियातील असद सरकार उलथून टाकण्याच्या कटासंदर्भात इराणने केलेल्या आरोपांना रशियाचा पाठिंबा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 13, 2024 | 03:47 PM
Russia supports Iran for coup in Syria Khamenei's claim confirmed

Russia supports Iran for coup in Syria Khamenei's claim confirmed

Follow Us
Close
Follow Us:

दमास्कस : सीरियातील असद सरकार उलथून टाकण्याच्या कटासंदर्भात इराणने केलेल्या आरोपांना रशियाचा पाठिंबा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे म्हटले की, सीरियातील अस्थिरतेसाठी अमेरिका आणि इस्रायल जबाबदार आहेत. खामेनी यांनी हा दावा करताना पुरावे असल्याचे सांगितले, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गती मिळाली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनीही खामेनी यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला असून, यासंदर्भात अधिक माहिती आणि पुरावे लवकरच समोर येतील, असे विधान केले आहे.

झाखारोवा यांच्या म्हणण्यानुसार, सीरियातील अस्थिरतेला अमेरिका आणि इस्रायलच्या कटाचा भाग मानले जात आहे. अमेरिकेने सातत्याने सीरियावर आर्थिक आणि सामाजिक दबाव टाकण्याचे धोरण अवलंबले आहे. विशेषतः, कोरोनाच्या महामारीच्या काळात, इतर देश मदतीचा हात पुढे करत असताना, अमेरिकेने निर्बंध कमी करण्यास नकार दिला होता. यामुळे सीरियातील जनतेवर दडपण आणून असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकटे पडले युनूस ! बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात जे काही चालले आहे यावर अमेरिकेची करडी नजर

इस्रायलबाबत बोलताना झाखारोवा म्हणाल्या की, या प्रकरणातील इस्रायलची भूमिका उघड आहे, कारण इस्रायलने याबाबत आपली भूमिका कधीही लपवलेली नाही. मात्र, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जाणीवपूर्वक सीरियामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण केली गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे सीरियातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पूर्णतः कोलमडली आहे, ज्याचा फायदा घेत अमेरिकेने आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्ट होते.

इराणच्या आरोपांवर रशियानेही सहमती दर्शवल्यामुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवे वळण मिळाले आहे. रशियाने म्हटले आहे की, चौकशीदरम्यान अमेरिकेच्या सहभागाचे ठोस पुरावे समोर येतील. झाखारोवा यांच्या मते, अमेरिकेने सीरियातील परिस्थितीला जाणीवपूर्वक ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे सीरियाच्या लोकांवर परिणामकारक निर्बंध लादण्यात आले. याचा परिणाम म्हणून, सीरियामधील असद सरकारला अस्थिर करण्याचे कट कारस्थान आखले गेले.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेतन्याहू यांना खरोखरच इराणमधील महिलांची काळजी आहे की खामेनेई सरकार उलथून टाकण्याचे षडयंत्र?

सीरियामधील ही स्थिती केवळ एका देशाच्या अंतर्गत अस्थिरतेचा प्रश्न नाही, तर जागतिक राजकारणातल्या सामरिक आणि आर्थिक हितसंबंधांशी जोडलेली आहे. सीरियामधील सरकार उलथून टाकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेच्या भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या भूमिकेविरोधात इराण आणि रशियाच्या आरोपांनी जागतिक पटलावर नवा वाद निर्माण केला आहे. पुढील काळात याबाबत अधिक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे सीरियामधील राजकीय स्थैर्य आणि सामान्य जनतेच्या हितासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते.

Web Title: Russia supports iran for coup in syria khameneis claim confirmed nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • syria news

संबंधित बातम्या

Syria News : असद राजवटीनंतर सीरियामध्ये नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू; निवडणुकीशिवाय करणार मंत्र्यांची निवड
1

Syria News : असद राजवटीनंतर सीरियामध्ये नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू; निवडणुकीशिवाय करणार मंत्र्यांची निवड

ना मुस्लिम ना ख्रिश्चन, मग कोण आहेत ड्रुझ? 8 लाख लोकसंख्या असलेला ‘गुप्त’ धर्म, ज्यासाठी इस्रायलने चढवला सीरियावर हल्ला
2

ना मुस्लिम ना ख्रिश्चन, मग कोण आहेत ड्रुझ? 8 लाख लोकसंख्या असलेला ‘गुप्त’ धर्म, ज्यासाठी इस्रायलने चढवला सीरियावर हल्ला

Israel Syria War : पुढची NEWS सांगायचीही संधी न देता, इस्रायलने केला थेट सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO
3

Israel Syria War : पुढची NEWS सांगायचीही संधी न देता, इस्रायलने केला थेट सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO

एका भाजी विक्रेत्याच्या मारहाणीने पेटले Israel-Syria War! 300 मृत्यूंच्या घटनेमागे लपलेली खरी कहाणी
4

एका भाजी विक्रेत्याच्या मारहाणीने पेटले Israel-Syria War! 300 मृत्यूंच्या घटनेमागे लपलेली खरी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.