vladimir putin
नवी दिल्ली – रशिया (Russia) युक्रेन युद्धाची झळ अख्या जगाला बसली आहे. या युद्धामुळं दोन्ही देशाचे (Country) मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अजूनही या दोन्ही राष्ट्रात वाद सुरु आहे. दरम्यान, आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (vladimir putins) यांनी पश्चिमेला धमकीवजा इशारा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले की, बेलारूसमध्ये अण्वस्त्रांची तैनाती केली असल्याची माहिती त्यांनी पहिल्यांदाच दिली. यावेळी त्यांनी पश्चिमेला इशारा देताना म्हटले की, ते रशियाला धोरणात्मक पराभव देऊ शकत नाहीत. पण त्यांनी लक्षात ठेवावे की, वेळ आली तर आम्ही अणुबॉम्बचा वापर करु शकतो, असा इशारा पुतिन यांनी पश्चिमेला दिला आहे.
बेलारूसला अण्वस्त्र ठेवल्याची माहिती
दरम्यान, सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाच्या प्रमुख आर्थिक मंचावर बोलताना पुतिन म्हणाले की, रशियाच्या सामरिक अण्वस्त्रे आधीच जवळच्या मित्र बेलारूसला वितरित केली गेली आहेत, परंतु रशियाला सध्या अण्वस्त्रांचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही, असं ते म्हणाले. मात्र जर गरज पडली किंवा तशी जर वेळ आली तर आम्ही त्याचा वापर करु असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. तुम्हाला माहिती आहे की आम्ही आमचे सहयोगी, (बेलारशियन अध्यक्ष (अलेक्झांडर) लुकाशेन्को यांच्याशी तडजोड, वाटाघाटी करत होतो की, आम्ही अण्वस्त्रांचा एक भाग बेलारूसच्या प्रदेशात हलवू असं पुतिन म्हणाले.
युक्रेनच्या पाठिंबानंतर पश्चिमेला इशारा
मीडियाच्या माहितीनुसार रशियाने युक्रेनला सशस्त्र आणि पाठिंबा देण्याबाबत पश्चिमेला इशारा म्हणून कारवाई केली होती. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर रशियाच्या बाहेर अशा प्रकारच्या वॉरहेड्सची मॉस्कोची पहिली तैनाती आहे, कमी पल्ल्याच्या अण्वस्त्रे, ज्याचा वापर युद्धभूमीवर केला जाऊ शकतो. आमचा धोरणात्मक पराभव करण्याचा विचार करीत आहेत, ते या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. अनेक दशकांपासून जागतिक मंचावर प्रथम आण्विक वॉरहेड्स बेलारूसच्या प्रदेशात वितरित केले गेले. पण फक्त हा पहिलात भाग आहे. यांचे अंतिम काम आम्ही उन्हाळ्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या अखेरीस पूर्ण करू, असं पुतिन म्हणाले.