Russia's Putin set up spy center to keep eye on NATO, satellite image
Russia News in Marathi : मॉस्को : सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहेत. अलास्कामधील त्यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प (Donald Trump) सोबतच्या बैठीनंतर त्यांचा जागतिक पातळीवर दबदबा वाढला आहे. नाटोमध्येही त्यांची दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच आणखी एका मोठ्या माहितीच्या खुलास्याने नाटोला धक्का बसला आहे.
‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, व्लादिमिर पुतिन नाटो देशांवर लक्ष ठेवण्यासाठी एक मोठे गुप्तचर केंद्र उभारत असल्याचा दावा केला जात आहे. याचे सॅलेलाइट्स इमेज देखील प्रसिध करण्यात आले आहेत. यानुसार, रशियाने हे गुप्तचर तळ कॅलिनिनग्राड प्रदेशात बांधण्यात येत आहे. पोलंड आणि लिथुआनिया येथील रशियाचा अर्थ-एक्सक्ल्हे असलेल्या भागात हे तळ उभारले जात आहे. हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून या तळाचे बांधकाम सुरु होते. जे जवळपास पूर्ण झाले आहे. सॅटेलाइट इमेजमध्ये एक गोलाकार रचानाकृती दिसून येत एहे. एक डिस्पोज्ड अँटेने अँरे (CDAA) सारखी दिसत हे. CDAA प्रणाली रेडिओ इंटेलिजेंसमध्ये मास्टर आहे. या प्रणालीद्वारे शत्रू देशांचे कोड मेसेजेस सहजपणे पकडतात येतात, त्यांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवता येते. तसेच आपल्याला संदेशही पाठवता येतात.
न्यूजवीकने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिनिनग्राड हा युरोपमधील महत्वाचा लष्करी भाग आहे. या ठिकाणी रशिया गुप्तपणे क्षेपणास्त्रे, रडार आणि नौदल तळ उभारत आहे. यामुळे रशिया नाटो देशांच्या संपर्कात अडथळा आणू शकतो. तज्ज्ञांच्या मते, रशियाची ही खेळी केवळ नाटो देशावर नजर ठेवण्यासाठीच नव्हे तर बाल्टिक समुद्र आणि उत्तर अटलांटिकमध्ये तैनात असलेल्या रशियन पाणबुड्यांशी संवाद साधण्यासाठी असेल.
तज्ज्ञांच्या मते, या तळाचा आकार CDAA पेक्षा मोठा आहे. अंदाजे १६०० मीटरपर्यंत हे तळ पसलेले आहे.हा तळ घनदाट जंगलामध्ये आहे. याठिकाणी आणखी सहा वेगवेगळे अँटेना रिग्ज बांधल्या जात आहे. रशियाच्या या गुप्त तळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) देशांची चिंता वाढली आहे.
चीनमध्ये मोठी दुर्घटना; बांधकाम सुरु असलेला रेल्वे पूल कोसळलयाने १० हून अधिक लोकांचा मृत्यू