
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला दोन महिने पुर्ण झाले आहेत. या युद्धात दोन्ही देशातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. काही दिवसांपुर्वाी दोन्ही देशाने युद्धबंदीचा प्रस्ताव स्विकारत अनेक लोकांची सुटकाही केली. आता मात्र, हे युद्ध पुर्णपणे थांबाव अशी मागणी होत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र महासभेत युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान घेण्यात आलं. जगभरातील 153 देशांनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध (Israel Hamas War) थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. भारतानेही संयुक्त राष्ट्र महासभेत युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे हे युद्ध आता थांबेल अशी आशा वाढली आहे.
[read_also content=”ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे याचं निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! https://www.navarashtra.com/movies/ravindra-berde-passed-away-at-the-age-of-72-nrps-488426.html”]
यापूर्वी आणलेल्या प्रस्तावावर अमेरिकेने व्हेटो केला होता. मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात संयुक्त राष्ट्र संघ अपयशी ठरल्याबद्दल अनेक देशांनी टीका केली होती, मात्र आता हा ठराव मंजूर झाल्याने गाझा पट्टीत सुरू असलेले हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणला जात आहे.
इस्रायल दोन महिन्यांहून अधिक काळ हमासचे युद्ध लढत असून या युद्धात आतापर्यंत 18,400 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली असून सर्वसामान्य लोकांना खाण्यापिण्याच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गाझामधील अनेक रुग्णालयेही उद्ध्वस्त झाली असून शेकडो लोकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जगातील अनेक देश पुढाकार घेत आहेत, मात्र इस्रायलने हमासला मुळापासून नष्ट करण्याची शपथ घेतली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या 193 पैकी 153 देशांनी युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. तर 23 देशांनी या मतदानात भाग घेतला नाही. भारतानेही १५३ देशांसोबत युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलने सातत्याने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे पण त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या आठवड्यातच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मतदानात अमेरिकेने युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावावर व्हेटो केला होता.
इस्रायल आणि हमासमधील हे युद्ध 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर 5,000 रॉकेट डागले आणि शेकडो लोक मारले. एवढेच नाही तर हमासने 250 हून अधिक लोकांना ओलीसही ठेवले होते. तेव्हापासून इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. दरम्यान सुमारे 6 दिवसांचा युद्धविराम झाला परंतु पुन्हा युद्ध सुरूच आहे.