Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नामांकित ‘Serena Hotel’ वर दहशतवाद्यांची नजर; पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाने जारी केला सुरक्षा अलर्ट

कराचीतील महागड्या हॉटेलांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ल्याच्या धमक्याचे वृत्त प्राप्त झाले आहे, असे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास कार्यालयाने सुरक्षा इशारा जारी केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 28, 2024 | 11:52 AM
Terrorist attack on prestigious Serena Hotel US embassy in Pakistan issues alert

Terrorist attack on prestigious Serena Hotel US embassy in Pakistan issues alert

Follow Us
Close
Follow Us:

कराची : कराचीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामुळे अमेरिकन कॉन्सुलेट जनरल (कॉन्स्युलर ऑफिस) ने सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की कराचीमधील उच्च श्रेणीतील हॉटेल्स तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित आहेत. कराचीतील महागड्या हॉटेलांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ल्याच्या धमक्याचे वृत्त प्राप्त झाले आहे, असे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास कार्यालयाने सुरक्षा इशारा जारी केला आहे. त्यामुळे उच्च श्रेणीतील हॉटेल अधिकृत यूएस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरते मर्यादित करण्यात आले आहे.

पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी जपानी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर जपानी नागरिक सुखरूप बचावले. याबाबत पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, हल्लेखोराने कराचीच्या लांधी भागात जपानी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला. तेथे 5 जपानी नागरिक होते. सर्व नागरिक सुखरूप असले तरी त्यांच्यासोबत असलेला खासगी सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानने डागले SMASH किलर मिसाइल; जाणून घ्या भारतासाठी किती मोठा धोका?

अमेरिकन नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

अमेरिकन दूतावासाने अमेरिकन लोकांना अनेक सूचना दिल्या आहेत ज्यामध्ये, सेरेना हॉटेल पेशावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जाणे टाळले जावे. ‘जर तुम्ही तणावाच्या ठिकाणी अडकलात तर तेथून ताबडतोब बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. देशाची स्थिती जाणून घेण्यासाठी बातम्यांकडे लक्ष द्या आणि अपडेट रहा. ओळखपत्र नेहमी सोबत ठेवा. तसेच सुरक्षेबाबत नेहमी सतर्क रहा.’ असे आवाहन पाकिस्तानमधील अमेरिकन दुतावासाने अमेरिकन नागरिकांना केले आहे.

#BREAKING: US Embassy in Pakistan issues Security Alert instructing US citizens to avoid the Serena Hotel in Peshawar of KPK in Pakistan till December 16th. US Citizens given do not travel to KPK advisory because of terrorism. pic.twitter.com/CjHJkuopJ6

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) November 27, 2024

एक दहशतवादी मारला गेला

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हल्लेखोर पायी आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून सहा हातबॉम्ब, एक SMG आणि तीन मॅगझिन्स जप्त केली आहेत. हल्लेखोरांच्या बॅगेत पेट्रोलच्या दोन बाटल्याही होत्या. सर्व सामान हल्लेखोरांकडे एका पिशवीत होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा दहशतवादी व्हॅनजवळ आला आणि त्याने स्वत:ला उडवले.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्लामाबादमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; इम्रान समर्थकांवर रेंजर्सनी केला गोळीबार, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू

चिनी कंपन्यांनाही धोका आहे

पाकिस्तान सध्या सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे हैराण आहे. यापूर्वी पाकिस्तानमध्ये बांधकाम करणाऱ्या चिनी नागरिकांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले होते. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत, पाकिस्तानमध्ये चीनला अरबी समुद्राशी जोडणारे रस्ते, रेल्वे, पाइपलाइन आणि बंदरांचे $65 अब्ज नेटवर्क आहे. चिनी नागरिकांना सुरक्षा पुरवता न आल्याने या मैत्रीत दुरावा निर्माण होऊ शकतो. अलीकडेच, पाकिस्तान सरकारने देखील कबुली दिली होती की ऊर्जा क्षेत्रातील चिनी कंपन्यांनी यावर्षी त्यांच्या गुंतवणुकीतून $170 दशलक्ष काढून घेतले आहेत.

 

 

 

Web Title: Terrorist attack on prestigious serena hotel us embassy in pakistan issues alert nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
1

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
2

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं
3

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं

Quadcopter : ना मिसाईल, ना बंदूक… या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत
4

Quadcopter : ना मिसाईल, ना बंदूक… या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.