The cheapest gold in the world is found in Bhutan not in Dubai
थिंफू : सोने ही एक अशी गोष्ट आहे की जी सर्वांनाच आकर्षित करते. सोन्याची कोणतीही गोष्ट असेल तर ती प्रत्येकालाच हवी असते. सोने हा महाग धातू असल्याने त्याचे मूल्य जास्त आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते? दुबईचे नाव तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशात उपलब्ध आहे? खरं तर, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भूतान… होय, जगातील सर्वात स्वस्त सोनं आशियाई देश भूतानमध्ये मिळतं, पण भूतानमध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळण्याची कारणं काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मात्र, जाणून घ्या भूतानमध्ये सोने सर्वात स्वस्त का आहे? जाणून घ्या यामागचे खरे कारण काय आहे ते.
जगातील सर्वात स्वस्त सोने भूतानमध्ये सापडते?
भूतानमध्ये स्वस्त सोने मिळण्याची अनेक कारणे असली तरी सर्वात मोठे कारण म्हणजे भूतानमध्ये सोने करमुक्त आहे. हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. याशिवाय भूतानमध्ये सोन्यावर कमी आयात शुल्क आहे. भूतान आणि भारताच्या चलनाचे मूल्य जवळपास सारखेच आहे. मात्र, जर तुम्ही भूतानमधून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही अटी लक्षात ठेवाव्या लागतील. वास्तविक, सोने खरेदी करण्यासाठी पर्यटकांना भूतान सरकारने प्रमाणित केलेल्या हॉटेलमध्ये किमान एक रात्र मुक्काम करावा लागतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 2025 च्या जगातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर; जाणून घ्या या 8 महान शक्तींमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे
दुबईत नाही तर जगातील सर्वात स्वस्त सोने भूतानमध्ये मिळते ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
यासाठी काय अटी व शर्ती आहेत?
याशिवाय पर्यटकांना सोने खरेदीसाठी अमेरिकन डॉलर आणावे लागतात. पर्यटकांना शाश्वत विकास शुल्क (SDF) भरावे लागते. त्याच वेळी, भारतीयांना प्रति व्यक्ती प्रतिदिन 1,200-1,800 रुपये मोजावे लागतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Nuclear Plant, बांगलादेश लवकरच अण्वस्त्रसंपन्न देशांच्या यादीत सामील होणार; जाणून घ्या भारताला याचा किती धोका
तसेच, पर्यटकांना सोने खरेदी करण्यासाठी पावती घेणे आवश्यक आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, भूतानमधील ड्युटी-फ्री शॉपमधून ड्युटी-फ्री सोने खरेदी करता येते. ही दुकाने सामान्यत: लक्झरी वस्तूंची विक्री करतात आणि ती वित्त मंत्रालयाच्या मालकीची असतात.