Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेनला दरमहा ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान, पाश्चात्त्य कंपन्यांनी रशियातून काढले २३ लाख कोटी

राजधानी कीव्ह ताब्यात घेण्याची रशियन योजना त्यांनी उधळली. परंतु, दीर्घ युद्धाचा विचार केला तर रशिया जिंकत आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या सैन्याने स्वेरडोनेत्स्क शहर ताब्यात घेतले. ते लवकरच लुहान्स्क प्रांताचा ताबा घेऊ शकतात. युक्रेनचे नेते म्हणतात की, आम्ही शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यात मागे आहोत. दररोज २०० सैनिक मारले जात आहेत, असे सरकार म्हणते. लष्करी नुकसानीबरोबरच युक्रेनची अर्थव्यवस्था कोसळत आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 02, 2022 | 06:17 PM
Indian students Trapp In Ukraine-Russia War

Indian students Trapp In Ukraine-Russia War

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – युक्रेनने एक छोटे युद्ध जिंकले आहे. त्याच्या गतिशील सैन्याने रशियाचे मोठे नुकसान केले आहे. राजधानी कीव्ह ताब्यात घेण्याची रशियन योजना त्यांनी उधळली. परंतु, दीर्घ युद्धाचा विचार केला तर रशिया जिंकत आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या सैन्याने स्वेरडोनेत्स्क शहर ताब्यात घेतले. ते लवकरच लुहान्स्क प्रांताचा ताबा घेऊ शकतात. युक्रेनचे नेते म्हणतात की, आम्ही शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यात मागे आहोत. दररोज २०० सैनिक मारले जात आहेत, असे सरकार म्हणते. लष्करी नुकसानीबरोबरच युक्रेनची अर्थव्यवस्था कोसळत आहे. दरमहा ३९,५५२ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

रशिया युक्रेनच्या तुलनेत आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या खूप मजबूत आहे. तथापि, युद्धा सुरू झाल्यावर पाश्चात्त्य कंपन्यांनी रशियातून २३.७३ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. प्रदीर्घ युद्ध रशियासाठी फायदेशीर आहे. रशियाचा विजयासाठी निर्घृण युद्ध गुन्हे करण्याचा बेत आहे. दुसरे उदाहरण म्हणजे शॉपिंग मॉलवरील हल्ला. त्याला युक्रेनियन लोकांचे मनोबल तोडायचे आहे. रशियन लोकांनाही आर्थिक फटका बसेल. तथापि, युक्रेनसाठी सर्व काही संपलेले नाही. त्याच्याकडे मोठ्या संख्येने खंदे लढवय्ये आहेत. त्याला पाश्चात्त्य देशांकडून लष्करी मदत मिळत आहे. रशियाची पुढे सरकण्याची गती मंद आणि आर्थिकदृष्ट्या महागडी आहे. नाटोची आधुनिक शस्त्रे, नवीन डावपेच आणि भरीव निधी यामुळे युक्रेन रशियन सैन्याला माघार घेण्यास भाग पाडू शकते.

युक्रेनला आता नाटो देशांकडून लांब पल्ल्याची अचूक शस्त्रे मिळू लागली आहेत. ३० जून रोजी युक्रेनने काळ्या समुद्रातील मोक्याच्या स्नेक बेटावरून रशियन सैन्याला हुसकावून लावत जबरदस्त यश मिळवले. रशिया युद्धभूमीवर हरू लागला तर क्रेमलिन सत्ताकेंद्रात असंतोष आणि अंतर्गत लढाई पसरेल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या सहायकांनी अंधारात ठेवले आहे, असे पाश्चात्त्य गुप्तचर संस्थांचे मत आहे. पुतीन आपले लष्करी कमांडर बदलत राहतात. नियुक्त जनरल अलेक्झांडर ड्वोर्निकोव्ह यांना हल्ल्याच्या पहिल्या आठवड्यात गोंधळानंतर पदच्युत करण्यात आल्याचे मानले जाते. रशियन अर्थव्यवस्थेवर पाश्चात्त्य निर्बंधांचा अधिक परिणाम झाला, तर राजकारण आणि व्यवसायातील पुतीन समर्थकांमध्ये असंतोष वाढेल.

Web Title: Ukraine loses rs 40000 crore per month western companies extract rs 23 lakh crore from russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 06:17 PM

Topics:  

  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

Russia Ukraine war: युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या
1

Russia Ukraine war: युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.