US Politics : इराणशी युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंगलट? लोकप्रियतेचा आलेख घरसला, खुर्ची धोक्यात? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War : ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचा पलटवार; Nuclear Attack ची धमकी, खाडी देश धोक्यात?
इराणसोबकतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अत्यंत अंतर्गत राजकाराणात वाईट अडकले आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून अमेरिकेत युद्धामुळे प्रचंड उलथा-पालथ सुरु आहे. ट्रम्प प्रशासनातील अनेक उच्च पदांवरीव अधिराऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. लष्करातही अनेक फेरबदल करण्यात आले आहे.
याशिवाय ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाली असून जनता रस्त्यावर विरोधात उतरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांची अप्रूवल रेटिंग घसरुन केवळ ३६ टक्क्यांवर आली आहे. ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात कमी रेंटिग मानली जात आहे. यामागचे कारण म्हणजे युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव कडाडले आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसले आहे. यामुळे अमेरिकेत संतापाचे वातावरण आहे. सुमारे ६०% लोकांनी इराण युद्धाला विरोध केला आहे. अनेक लोक नो किंग्स आंदोलनात उतरले आहे. प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
अटर्नी जनरल पाम बॉंडी यांना पदावरुन हटवल्यानेही मोठी खळबळ उडाली आहे. तुलसी गबार्ड, हॉर्वड लुटनिक यांनाही काढू टाकण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर टीकेचा धनी व्हावे लागल्यानंतर आता त्यांना देशांतर्गत आणि लष्करी पातळीवरही असंतोषाचा सामना करावा लागत आहे. इराणवर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या मुद्दधावरून लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. रॅन्डी जॉर्ज यांच्यासोबतच आर्मी जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन या अधिकाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
या युद्धामुळे ट्रम्प दुहेरी वादात सापडले आहे. एकीकडे युद्ध लांबत चालल्यामुळे देशात आर्थिक भार वाढत आहे. दुसरीकडे इराणमध्ये सत्ता परिवर्तनाचा प्रयत्नही फेसला आहे. तसेच जनतेचा ट्रम्प यांच्यावरील विश्वासही कमी होत चालला आहे. मात्र ट्रम्प यांनी नेमहमीप्रमाणे यासाठीही मीडियाला जबाबादार धरले आहे. युद्धाचे नकारात्मक कव्हरेज दिल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक मित्र राष्ट्रांनीही पाठ फिरवली आहे.
भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?
Ans: इराणसोबतच्या संघर्षामुळे देशात महागाई वाढत आहे, इंधन दरवाढ आणि ट्रम्प यांच्या युद्धनीतीला तीव्र विरोध होत आहे. त्यांच्या लोकप्रियततेतही घट झाली आहे.
Ans: अमेरिकन जनता इराण युद्धाला तीव्र विरोध करत आहे. या युद्धामुळे देशात इंधन दरवाढ झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.






