Vietnam braces for Typhoon Kajiki, thousand evacuted, flight canceled
Vietnam News in Marathi : हनोई : व्हिएतनामध्ये ( Vietnam) सर्वात शक्तिशाली वादळ काजिकीचा इशारा देण्यात आला आहे. व्हिएतनामच्या हवामान खात्याने, काजिकी वादळ व्हिएचनामाच्या मध्य किनाऱ्याकडे सरकत असल्याचे सांगितले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा वेग ताशी १७५ किमी असून वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहेत. सध्या मुसळधार पावसाने व्हिएतनामला झोडपले आहे.
यामुळे परिस्थिती लक्षा घेऊन व्हिएतनाम सरकाने देशभरातील विमानतळे बंद केली आहे. शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच व्हिएकनामच्या मध्य किनाऱ्याकडील प्रांतातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ५.८६ लाख लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. व्हिएनामच्या थान होआ, क्वांग ट्राय, ह्यू आणि दानंग प्रांतामध्ये १.५० लाखाहून कुटुंबांनाही घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच सरकारने आपत्कालीन सेवा आणि बचाव पथकांना देखील तैनात केले आहे. लोकांर्यंत वेळेत मदत पोहोचवण्याचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश आपत्कालीन सेवांना देण्यात आले आहे.
भारतावर का लादला आहे अतिरिक्त टॅरिफ; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी खुला केला ट्रम्पचा मास्टर प्लॅन
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काजिकी वादळ ताशी १७५ किमी वेगाने दक्षिण चीनच्या समुद्राच्या दिशेने पुढे जात आहे. सध्या व्हिएतनामध्ये वादळापूर्वी मुसळधार पाऊसही सुरु आहे. विन्हच्या किनारी शहरात रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या सरकारने समुद्री भागात बोटिंग करण्यास मनाई केली आहे.
गेल्या वर्षी यागी वादळाचाही फटका व्हिएतनामला बसला होता. यामुळे व्हिएतनामचे प्रचंड नुकसान झाले होते. पूर आणि भूस्खलनामुळे २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता झाले होते.
तसेच हवामान विभागाने, काजिकी वादळ चीनच्या हैनान बेटावरुन जाणार असल्याची शक्यता व्यक्ती केली आहे. यामुळे सध्या बेटावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु आहे. तसेच स्थानिक पर्यटन स्थळे, शाळा, दुकाने, कार्यालये आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चीनच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये मुसधार पाऊस पडत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात चीनला ५२.१५ अब्ज युआन म्हणजे ६.०६ कोटी रुपयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. तसेच १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
गाझाच नव्हे तर ‘या’ देशातही उपासमारीमुळे बळी; गेल्या दोन महिन्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू