गाझाच नव्हे तर 'या' देशातही उपासमारीमुळे बळी; गेल्या दोन महिन्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायल आणि हमास युद्धाने गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संयुक्त राष्ट्राने गाझाला अधिकृतपणे दुष्काळग्रस्त शहर म्हणून जाहीर केले आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे सध्या गाझात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मानतावदी मदतही कमी पडत आहे. यामुळे अनेक लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू होत आहे. यामध्ये विशेष करुन लहान मुलांचा समावेश आहे.
याच वेळी आणखी एका शहरात उपासमारी वाढत आहे. गाझापासून १२०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुदान शहरातही हीच परिस्थिती निर्माण होत आहे. सुदान डॉक्टर्स नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्याक उपासमारीमुळे दक्षिण कॉर्डोफान राज्यात ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतेक करुन लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.
गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
सुदानमध्येही एप्रिल २०२३ पासून गृहयुद्ध सुरु आहे. सुदानचे सशस्त्र दल (SAF) आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF)या दोन गटांमध्ये हा संघर्ष सुरु आहे. अफ्रिकी देश असलेल्या सुदानमध्ये सध्या तीव्र संघर्ष सुरु आहे. दलांमध्ये सत्ता कुणी ताब्यात घ्यायची यावरुन हा संघर्ष सुरु आहे.
पण या संघर्षात अनेक कुटुंबे अडकली आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शिवाय गर्भवती महिलांवर आणि लहान मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे.
सुदानमध्ये अन्नाची गरज असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे. शिवाय वैद्यकीय सुविधांचीही मदत अपुरी पडत आहे. कुपोषणामुळे नवजात बालकांचा मृत्यू होत आहे, तर जन्मलेल्या बाळांना पोषक अन्न मिळणे कठीण झाले आहे.
रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) २०२३ पासुन सुदानी सैन्याविरोधात युद्ध करत आहेत. सुदानच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे लष्कर उपासमारीचा रणनीती म्हणून वापर करत आहे. याला डॉक्टरांनी तीव्र विरोध केला आहे. याला मानवतेविरुद्धचा गुन्हा आणि आंतरराष्ट्री मानवी कायद्यांचे उल्लंघन मानले आहे.
RSF च्या आणि सुदानी सैन्याच्या संघर्षामुळे दक्षिण कोर्डोफानमध्ये अन्न, आणि वैद्यकीय सुविधांची उपलब्धता मर्यादित आहे. यामुळे सुदानमधील लोकांनी आंतरराष्ट्रीय समुदायांना यामध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी सुदानमधील संघर्षाला तीव्र निषेध केला आहे. अनेक देशांनी सुदानमधील अमानवी कृत्यांविरुद्ध एकत्र येऊन कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या सघर्षामुळे मोठी जीवीतहानी झाली आहे.
Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू