फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; 87 हजार लोकांचे स्थलांतर, अनेक उड्डाणे रद्द
मनीला: फिलिपाइन्समध्ये कॅनलोन ज्वालामुखीचा काल ( 9 डिसेंबर 2024) मोठा उद्रेक झाला. यामुळे शहरातील सुमारे 87 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ज्वालामुखीच्या या स्फोटामुळे राखेचे ढग अवकाशात हजारो किलोमीटवर पसरलेले आहेत. तसेच फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीने याबाबत माहिती दिली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा ज्वालामुखीचा उद्रेक कमी प्रमाणात झाला होता.
अधिक स्फोटक उद्रेक होण्याची शक्यता
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राखेचे प्रचंड प्लम्स आणि वायुचे गरम प्रवाह आणि ढिगारा पश्चिमेकडील उतारांवरुन खाली आला. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मात्र,यामुळे मध्ये निग्रोस बेटावरील माउंट कॅनलोन ज्वालामुकीच्या स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीने अधिक स्फोटक उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय, ज्वालामुखीची राख ज्वालामुखीच्या पश्चिमेला 200 किलोमीटर (124 मैल) पेक्षा जास्त समुद्र ओलांडून अँटिक प्रांतासह विस्तीर्ण क्षेत्रावर पडली आणि दूसर झाली आहे. ही राख आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे फिलिपिन्सचे मुख्य ज्वालामुखीशास्त्रज्ञ तेरेसिटो बाकोलकोल आणि इतर अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले आहे.
Huge volcano eruption at Mount Kanlaon in Negros Island Region, Philippines 🇵🇭 (09.12.2024)
TELEGRAM JOIN 👉 https://t.co/9cTkji5aZq pic.twitter.com/8ziNF9azH7
— Disaster News (@Top_Disaster) December 9, 2024
सिंगापूर उड्डाणे रद्द
नागरी सुरक्षेला प्राधान्य देत फिलिपाइन्स सरकारने कॅनलोनच्या भागातील सहा देशांतर्गत उड्डाणे आणि सिंगापूरला जाण्याऱ्या फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. तसेच नेग्रोस ऑक्सीडेंट शहर आणि कॅनलोन पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील उतारांजवळील शहरे आणि खेड्यांमध्ये लोकांचे देखील निर्वासन केले आहे.
सुमारे 47,000 लोकांना 6 किलोमीटर दूर हलवावे लागले बाहेर काढले आहे. शहराच्या महापौर रुमायला मांगलीमुतन यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपर्यंत, 6 हजारहून अधिक लोकांना कॅस्टेलानामधील निर्वासन केंद्रांमध्ये गेले असून काहींनी नातेवाईकांच्या घरी स्थलांतर केले आहे.
प्रशासनाकडून कर्फ्यू
अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी सांगितले आहे की, मोठ्या संख्येने लोकांना विस्थापित केले जात आहे. तसेच अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे कार्य देखील सुर करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारी शास्त्रज्ञ विषारी ज्वालामुखीय वायूंच्या प्रदूषणाच्या धोक्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवत होते. याशिवाय प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली असून अतिसंवेदनशील भागात कर्फ्यू लागू केला आहे.