World's happiest countries ranked India's position revealed
World Happiness Report 2025 : ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिना’निमित्त, संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report 2025) जाहीर केली आहे. २०२५ च्या या यादीत १४७ देशांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक युद्धग्रस्त देशांचाही समावेश आहे. या अहवालात समाविष्ट केलेल्या १४७ देशांना तेथील लोकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेच्या आधारे क्रमवारी देण्यात आली आहे. अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यात ते त्यांच्या आयुष्यात किती आनंदी आहेत, त्यांच्याकडे किती पैसे आहेत, त्यांचे आरोग्य कसे आहे आणि ते किती स्वतंत्र आहेत, अशा विविध प्रश्नांचा समावेश होता.
‘आंतरराष्ट्रीय आनंद दिना’निमित्त, संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report 2025) जाहीर केली आहे. २०२५ च्या या यादीत १४७ देशांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक युद्धग्रस्त देशांचाही समावेश आहे. या अहवालात समाविष्ट केलेल्या १४७ देशांना तेथील लोकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेच्या आधारे क्रमवारी देण्यात आली आहे. अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यात ते त्यांच्या आयुष्यात किती आनंदी आहेत, त्यांच्याकडे किती पैसे आहेत, त्यांचे आरोग्य कसे आहे आणि ते किती स्वतंत्र आहेत, अशा विविध प्रश्नांचा समावेश होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतीय ‘BOFORS’ रणांगण हादरवणार; स्वदेशी ATAGS तोफेच्या रूपात लष्कराला मिळाली नवी ताकद
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप, यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क आणि स्वतंत्र संपादकीय मंडळाच्या भागीदारीत जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report) २० मार्च रोजी प्रकाशित केला. हा अहवाल तयार करताना देशातील दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण या महत्त्वाच्या निकषांचा विचार केला जातो. या अहवालामध्ये सर्वात आनंदी आणि सर्वात कमी आनंदी देशांमधील तफावत अधोरेखित करण्यात आली आहे.
यादीत अफगाणिस्तान सर्वात खालच्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वांत टॉप-५ देशांमध्ये तर फिनलंड पहिल्या क्रमांकावर असून डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड्स यांचा क्रमांक लागला आहे. या यादीत भारत ११८ व्या स्थानावर आहे. ही परिस्थिती खूप वाईट आहे. पण २०२४ च्या तुलनेत भारताचे रँकिंग सुधारले आहे. गेल्या वर्षी भारत १२६ व्या क्रमांकावर होता. जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक भारतापेक्षा चांगला आहे. या यादीत पाकिस्तान भारतापेक्षा ९ स्थानांनी वर आहे, म्हणजेच १०९ व्या स्थानावर आहे. जगातील अनेक युद्धग्रस्त देशांची क्रमवारीही भारतापेक्षा चांगली दाखवण्यात आली आहे. यामध्ये युक्रेन, पॅलेस्टाईन, इराक, इराण सारखे देश देखील समाविष्ट आहेत. या देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक मुद्देही वर्चस्व गाजवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 118 कोटींना विकली गेलेली एम. एफ. हुसेन यांची पेंटिंग; जाणून घ्या काय आहे खास?
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५ – देशांची क्रमवारी
भारत आणि शेजारील देशांची स्थिती:
भारत – 118 वा
श्रीलंका – 133 वा
बांगलादेश – 134 वा
पाकिस्तान – 109 वा
नेपाळ – 92 वा
चीन – 68 वा
पहिल्या २० आनंदी देशांची यादी:
फिनलंड
डेन्मार्क
आइसलँड
स्वीडन
नेदरलँड्स
कोस्टा रिका
नॉर्वे
इस्रायल
लक्झेंबर्ग
मेक्सिको
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
स्वित्झर्लंड
बेल्जियम
आयर्लंड
लिथुआनिया
ऑस्ट्रिया
कॅनडा
स्लोव्हेनिया
चेक प्रजासत्ताक
अमेरिका आणि यूकेची स्थिती:
अमेरिका – 24 वा
युनायटेड किंग्डम – 23 वा
सर्वात कमी आनंदी देश:
अफगाणिस्तान – 147 वा (सर्वात खालचा)
सिएरा लिओन
लेबनॉन