Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाच राज्यांचे राजकीय भवितव्य अवघ्या काही तासांवर, वाचा एका क्लिकवर

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा निकाल १० मार्चला (10 March Election Result) जाहीर होणार होणार आहे. सकाळपासूनच मत मोजणी सुरु होईल. साधारण १० वाजल्यापासून निकालाचे कल येण्यास सुरुवात होईल. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाब येथील निकाल लक्षवेधी आहेत.  या निवडणुकांच्या निकालाला सुरूवात होणार आहे. याच्या वेगवान अपडेट आम्ही तुम्हाला नवराष्ट्र.कॉम वर दाखवणार आहोत.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 09, 2022 | 09:45 PM
पाच राज्यांचे राजकीय भवितव्य अवघ्या काही तासांवर, वाचा एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुक (Five State Election result) पाचही राज्यात निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. एक्झिट पोलही आले (Election Exit Poll) आहेत. आता प्रतीक्षा आहे फक्त निवडणूक निकालाची. येत्या १० मार्चला सकाळी १० वाजल्यापासून (10 March Election result) या निवडणुकांच्या निकालाला सुरूवात होणार आहे.

याच्या वेगवान अपडेट आम्ही तुम्हाला नवराष्ट्र.कॉम वर दाखवणार आहोत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा यात समावेश आहे. पाच पैकी चार राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र काल समोर आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपला मोठा झटका बसणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुक्ता आणखी वाढली आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्ता मिळताना दिसतेय. तर गोवा आणि उत्तराखंड भाजप गमावण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पाच राज्यांना मिनी लोकसभा म्हटले जाते. त्यामुळे निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

२०१७-पाचही राज्यांमधील पक्षीय बलाबल काय?

उत्तर प्रदेश – एकूण जागा ४०३

भाजप-३२५
समाजवादी पक्ष-४७
बसपा-१९
काँग्रेस-७

पंजाब– एकूण जागा-११७

भाजप-३
काँग्रेस-७७
आप-२०
अकाली दल-१५

गोवा– एकूण जागा ४०

भाजपा-१७
कॉंग्रेस-१३
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष-३
गोवा फॉरवर्ड – ३

मणिपूर – एकूण जागा ६०

भाजपा-२१
काँग्रेस – २८
स्थानिक पक्ष-११

उत्तराखंड – एकूण जागा-७०

भाजपा-५७
काँग्रेस-११
स्थानिक पक्ष-२

गोव्यात काँग्रेस अलर्ट मोडवर

मागच्या वेळी एक नंबरचा पक्ष असूनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरलेल्या काँग्रेसला भाजपाची धास्ती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासून प्रत्येक आमदाराच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते-मंत्री सतेज पाटील यांच्याकडे निकालाच्या दिवसापासून ही जबाबदारी देण्यात आली असून ते निकालानंतर नेमकी काय भूमिका घेतात याकडे देशाचं लक्ष असेल.

पंजाबमध्ये आपचा बोलबाला

पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये येईल, असं बोललं जातंय. टुडेज चाणक्यने निवडणुकीबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप समोर येईल, असं सांगण्यात आलं आहे.

भाजपची डोकेदुखी वाढणार?

उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा वाजण्याची शक्याता आहे. गोव्यात कुठल्याचा राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती तयार होण्याची शक्यात या एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Assembly election results 2022 for uttar pradesh punjab goa uttarakhand manipur elections result 2022 on 10th march 2022 see the details here nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2022 | 09:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.